World AIDS Day 2023 : HIV आणि AIDS यात काय फरक आहे? जास्त गंभीर कोणता आजार?

लोकांमध्ये या आजाराची जनजागृती करण्यासाठी आज जागतिक एड्स दिन साजरा केला जातोोो
World AIDS Day 2023
World AIDS Day 2023esakal

World AIDS Day 2023 : 

एड्स हा एक गंभीर आजार आहे, जो अनेकांसाठी प्राणघातक ठरू शकतो. या आजाराबाबत जागरूकता नसल्यामुळे अनेकदा गंभीर परिणाम लोकांना भोगावे लागतात. एचआयव्ही संसर्गाच्या प्रसारामुळे होणाऱ्या एड्सच्या साथीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.

बरेच दिवस या आजाराची चर्चा कानावर पडत असली. तरीही आजही अनेकांना एचआयव्ही आणि एड्समधील फरक नीट कळत नाही. त्यामुळे अनेकदा त्यांना योग्य उपचार मिळण्यास उशीर होतो. अशा परिस्थितीत आज जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही आणि एड्समध्ये काय फरक आहे, हे जाणून घेऊयात.

World AIDS Day 2023
World AIDS Day 2023 : बाई आणि डिंपलताईंनी HIV बाधितांच्या आयुष्यात फुलवलीय 'पालवी'

HIV म्हणजे काय?

एचआयव्ही तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींना संक्रमित करते आणि नष्ट करते. ज्यामुळे इतर रोगांशी लढणे कठीण होते. अशा प्रकारे, जेव्हा एचआयव्ही तुमची प्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत करते. तेव्हा ते ऍक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम किंवा एड्स होऊ शकते.

AIDS म्हणजे काय?

एड्स हा एचआयव्हीमुळे होणारा रोग आहे. जो या संसर्गाचा शेवटचा आणि सर्वात गंभीर प्रकार आहे. हा एक गंभीर टप्पा आहे. एड्स ग्रस्त लोकांमध्ये पांढऱ्या रक्त पेशींची संख्या खूप कमी असते आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील अत्यंत कमी होते.

World AIDS Day 2023
World AIDS Day : इंटिग्रेस स्ट्रँड ट्रान्स्फर इनहिबिटर एचआयव्ही व्यवस्थापनात प्रभावी; विविध तज्ज्ञांचा विश्‍वास

HIV आणि AIDS या दोन्हीतील फरक काय आहे?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, एचआयव्ही आणि एड्समधील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे एचआयव्ही हा एक विषाणू आहे. जो तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो. तर, एड्स हा एक गंभीर आजार आहे.

ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती अगदी खालच्या पातळीवर जाऊन पोहोचते. तेव्हा एचआयव्ही संसर्ग होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाल्याशिवाय एड्स होऊ शकत नाही.

हे देखील खरे आहे की एचआयव्ही ग्रस्त प्रत्येक व्यक्तीला एड्स होत नाही. परंतु योग्यवेळी उपचार न केल्यास एचआयव्हीमुळे एड्स होऊ शकतो.

World AIDS Day 2023
Aided Schools : राज्यातील अनुदानित शाळांना ४९ कोटींचे वेतनेतर अनुदान मंजूर

HIV च्या तीन पायऱ्या

HIV विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर, एड्स त्याच्या तीन टप्प्यांतून जातो. एचआयव्हीचे तीन टप्पे पुढीलप्रमाणे आहेत –

अक्यूट एचआईवी : काही लोकांना एचआयव्हीची लागण झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांनी फ्लूसारखी लक्षणे दिसतात. ही लक्षणे अनेकदा आठवडा ते एक महिन्याच्या आत निघून जातात.

क्रॉनिक स्टेज : पहिल्या टप्प्यात व्हायरस आढळला नाही, तर व्यक्ती दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करते. याचा अर्थ तुम्हाला आजारी न वाटता अनेक वर्षे एचआयव्ही होऊ शकतो. लक्षात ठेवा की तुम्हाला बरे वाटत असले तरीही तुम्ही इतरांना एचआयव्ही पसरवू शकता.

एड्स : एड्स हा एचआयव्ही संसर्गाचा सर्वात गंभीर आणि अंतिम टप्पा आहे. या टप्प्यावर, एचआयव्हीने तुमची रोगप्रतिकारक शक्ती गंभीरपणे कमकुवत केली आहे आणि तुम्ही आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com