World Autism Awareness Day 2024 : 'ऑटिझम आणि मतिमंदत्व यात मोठा फरक आहे'

ऑटिझमसारखा विकार कशामुळे होतो?
World Autism Awareness Day 2024 :
World Autism Awareness Day 2024 : esakal

स्वमग्नतेच्या कोशातून...

बालमेंदूविकार तज्ज्ञ - डॉ. तृप्ती भोसले

आजच्या 2 एप्रिल, जागतिक ऑटिझम जागरूकता दिवसाच्या निमित्ताने ऑटिझम विषयीची सविस्तर माहिती या लेखातून घेऊ.

आपल्या मुलाला वयानुसार फारसे बोलता येत नाही, एकटे राहणे, चंचलपणा ,आपण काय सांगतो याकडे अजिबात लक्ष न देणे , उगाच चिडचिड करणे , रडणे अशी लक्षणे दिसली की बहुदा पालक व घरचे मूल फार हट्टी आहे अशी समजूत काढून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण ही स्वमग्नतेची लक्षणे असू शकतात. स्वमग्न मुलांमध्ये कोणतेही शारीरिक व्यंग नसल्याने त्याची बरीच लक्षणे पालकांना ओळखता येत नाहीत व निदान होण्यास उशीर होतो.

World Autism Awareness Day 2024 :
World Autism Awareness Day 2024 : मूल स्वमग्न असेल तर कसे ओळखावे? जाणून घ्या लक्षणे

ऑटीझम म्हणजेच स्वमग्नता हा एक मेंदूचा विकासात्मक विकार असून ,यामधे प्रामुख्याने संवाद साधण्याच्या कौशल्यावर, socialization वर परिणाम झालेला असतो. सोप्या भाषेत ..."स्वतःच्याच नादात किंवा विश्वात राहणे म्हणजे स्वमग्नता "

आज जगभरात दर ५०-६० मुलांमध्ये एका मुलाला ऑटीझम ची समस्या आहे व हे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.त्यामुळे गैरसमज टाळून याविषयी अधिक जागरूक होणं गरजेचं आहे.

समस्या व सामाजिक जागरूकतेची गरज

स्वमग्नता का होते याचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. गर्भावस्थेतील जंतुसंसर्ग, बदलेली जीवनशैली, गुणसूत्रातील बदल ,मोबाईलचा अतिवापर अशा अनेक शक्यता असल्या तरी यापैकी कोणतेही ठोस कारण शास्त्रज्ञांनाही सापडलेले नाही.

ऑटीझम ही स्पेक्ट्रम डिसऑर्डर असून यामधे अगदी सौम्य,मध्यम ते अतितीव्रता असे प्रकार असल्याने प्रत्येक मुलाची लक्षणे ,स्वरूप निरनिराळे असू शकते. परिणामी त्यांचा उपचारपद्धतीला प्रतिसादही वेगळा असतो.

यामुळे प्रत्येक ऑटीझम ग्रस्त मुलाच्या पालकांचा प्रवास निराळा आहे. अनेक अडचणी आहेत . अगदी आवश्यक असणाऱ्या थेरपीजची उपलब्धता ते मुलाला कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा ,तो घ्यावा की नाही अशा अनेक समस्यांशी चार हात करताना योग्य माहितीअभावी पालकांची कसरत होते. त्यात आपला म्हणजेच समाजाचा निव्वळ अज्ञानापोटी त्यांच्याकडे पाहण्याचा विचित्र दृष्टीकोन आणखी त्रासदायक ठरू शकतो.

World Autism Awareness Day 2024 :
autism day : धुळ्यात "ऑटिझम सेंटर' पालकांसाठी आधारवड 

महत्वाचं म्हणजे ऑटिझम आणि मतीमंदत्व यात फरक आहे हेही आपण समजून घेतले पाहिजे. अशी मुले सामान्य मुलांप्रमाणे चुणचुणीत नसली तरी ती अगदीच मंदही नसतात. उलट एखाद्या विशिष्ट गोष्टीत हे सामान्य मुलांपेक्षाही तरबेज असतात. हा विकार समजून घेऊन आपण ऑटिझम असणाऱ्या मुलांसाठी काही विशेष गोष्टी करता येतात का यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

जसे की त्यांना वेगळी वागणूक देण्याऐवजी सामावुन घेणे, जास्तीतजास्त संवाद साधणे, मैदानी खेळ खेळणे, सगळ्यात महत्त्वाचं मुलांना मोबाईल देणं पूर्णपणे बंद करणे इ.होय.

आपल्या पाल्याला ऑटीझम आहे हे समजल्यानंतर खचून न जाता त्याचा स्वीकार करण्याची आणि अचूक उपचाराची गरज आहे. जितक्या लवकर उपचार सुरू होतील तितकी सुधारणा होण्याची शक्यता जास्त.       

World Autism Awareness Day 2024 :
Virtual Autism : गॅजेट्स वापरण्यात हुशार आहे मूल ? पालकांनो, आत्ताच व्हा सावध !

मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेत  त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणताना त्यांना काही शास्त्रीय पद्धती उपयोगी ठरू शकतात. यासाठी पालकांनीही तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी.

ऑटिझम ग्रस्त मुलांना त्यांचे जीवन स्वच्छंदीपणे जगता यावे यासाठी कोल्हापुरात बालमेंदूविकार तज्ज्ञ डॉ. तृप्ती भोसले संचलित न्यूरॉन चाईल्ड न्यूरॉलॉजी सेंटर, कोल्हापूर येथे योग्य व प्रभावी पद्धतीने उपचार केले जातात. येथे सर्व बालमेंदूविकाराशी संबंधित विविध प्रकारच्या समस्यांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार दिले जातात.

प्रत्येक मूल ही निसर्गाची अमूल्य देण आहे..तेव्हा "आंतरराष्ट्रीय स्वमग्नता जागृती दिना" निमित्त ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवुया, जागृत  राहून आपल्या मुलांचे भविष्य सुखकर करूया....!!

डॉ. तृप्ती भोसले

बालमेंदूविकार तज्ज्ञ, न्यूरॉन चाईल्ड न्यूरॉलॉजी सेंटर, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com