world biryani day: भारतात बिर्याणी आली तरी कुठून ?

बिर्याणी हा एक परदेशी खाद्यपदार्थ आहे. पण बिर्याणी भारतात आली अन फक्त आपल्या चवीमुळे भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली.
biryani
biryanigoogle

मुंबई : जवळपास खूप लोक हे व्हेज, मटण आणि चिकन बिर्याणी खूप आवडीने खातात. बिर्याणी लाखो दिलांवर आपलं अधिराज्य गाजवते.आज ३ जूलै म्हणजेच जागतिक बिर्यानी दिवस आहे. त्यानिमित्ताने बिर्याणीचा नेमका इतिहास काय आहे ? बिर्याणीचा जन्म कसा झाला ? याचीच सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

बिर्याणी हा एक परदेशी खाद्यपदार्थ आहे. पण बिर्याणी भारतात आली अन फक्त आपल्या चवीमुळे भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली.

बिर्याणीचे नुसतं नाव ऐकताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटते. मग ती व्हेज बिर्याणी असो किंवा नॉन व्हेज बिर्याणी. आपण शहरे बदली कि आपोआप बिर्याणीची चवही बदलते. चला तर मग जाणून घेऊया बिर्याणीशी संबंधित काही रंजक किस्से.

बिर्याणी म्हणजे बासमती तांदळात मटण-चिकन आणि मसाल्यांचा संगम इतका हिट आणि फिट असतो की जिभेला आणि मनालाही अतृप्त करुन टाकतो. बिर्याणी ही परदेशी डिश असून इराणमध्ये बिर्याणीला प्रसिद्धी मिळाल्यावर मुघलांनी एकप्रकारे ती आपली खास डिश बनवून टाकली यात शंका नाही.

असे सांगितले जाते की, मुघलांच्या काळात मटण बिर्याणी आणि चिकन बिर्याणी जास्त खाल्ले जायचे. त्याकाळात बिर्याणीने भारतात खूप नाव कमावले आहे. तुम्ही जर का भारतच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात फिरलात तर तुम्हाला जवळपास पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक प्रकारच्या बिर्याणी प्रकार पाहायला मिळतील.

त्यात खासकरुन हैदराबादी आणि लखनौवी बिर्याणी पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच दक्षिण भारतीय राज्यांमध्ये बिर्याणी, सिंधी बिर्याणी, रामपुरी बिर्याणीचे अनेक प्रकार सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. बिर्याणीची लोकप्रियता इतकी वाढली की भारताचे प्रमुख राज्य सोडा, तर आता छोट्याछोट्या शहरांमध्येही वेगवेगळ्या चवींच्या आणि बिर्याणीचे प्रकार पाहायला मिळत आहेत.

खरी बिर्याणी ही मटणाची असते, पण तरी देखील चिकन बिर्याणीची मोठी चलती दिसुन येते. मुस्लिम बांधवाच्या भागात बीफ बिर्याणीही खाल्ली जाते.

बिर्याणीचा नेमका इतिहास?

बिर्याणीचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला तर बिर्याणी हा शब्द 'बिरंज बिर्यान' या पर्शियन (इराणी) शब्दापासून बनला आहे. पर्शियनमध्ये भाताला बिरंज म्हणतात आणि बिर्याण म्हणजे शिजवण्यापूर्वी तळलेले मटण असा होतो.

बिर्याणी विषयी काही आख्यायिका देखील प्रसिद्ध आहेत आता त्याविषयी माहिती बघूया.

पहिली आख्यायिका अशी, की मुघल सम्राट शाहजहानच्या बेगम मुमताज महलने लष्करी छावणीला भेट दिली तेव्हा त्यांना सैनिकांची शारीरिक स्थिती कमकुवत दिसली. तेव्हा मग त्यानी शाही आचाऱ्याला सैनिकांसाठी एक खास पदार्थ तयार करायला सांगितला,.

त्या पदार्थात तांदूळ, मांस आणि मसाले टाकून एक खास डिश तयार करण्यास सांगितले. या पदार्थालाच मग बिर्याणी म्हटले जाऊ लागले.

दुसरी आख्यायिका अशी की सम्राट तैमूरने भारतात बिर्याणी आणली होती असेही म्हटले जाते. तिसरा युक्तिवाद असा की जे अरब व्यापारी दक्षिण भारतीय किनार्‍यावर व्यवसायासाठी उतरले होते त्यांनी त्यांच्याबरोबर बिर्याणीची रेसिपी आणली होती.

सुरक्षेसाठी या व्यापाऱ्यांनी आपल्यासोबत काही सैनिकही आणले होते. आपण असे गृहीत धरू शकतो की बिर्याणीची डिश ही पौष्टिकतेने भरलेली आणि झटपट तयार होणारी आहे.

बिर्याणी भारतात आल्यानंतर बिर्याणीच्या चवीत रंगत कशी आली?

भारतीय पदार्थांत देशी तूप, जायफळ, गदा, काळी मिरी, लवंगा, दालचिनी, मोठी आणि छोटी विलायची, तमालपत्र, धणे आणि पुदिन्याची पाने, आले, लसूण आणि कांदा यासह केशर घालण्याची प्रथा होती. हिच प्रथा बिर्याणीवर अमंलात आणली गेली आणि बिर्याणीच्या चवीत रंगत आली.

काही काळानंतर भारतातील शाकाहारी लोकांनी व्हेज बिर्याणीचा ट्रेंड सुरू केला. या बिर्याणीमध्ये तांदूळ ,बटाटे, भाजी, पनीर, मसूर,गाजर आदी मसाले घालून व्हेज बिर्याणी तयार केली जाऊ लागली.

बिर्याणीवर ताव मारतांना या गोष्टी लक्षात ठेवा.

1) बिर्याणीमध्ये फॅट जास्त असते, त्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो.

2) यासोबतच बिर्याणीत पडलेल्या अधिक मसाल्यांमुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो,त्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com