World Coffee Day
World Coffee Day

World Coffee Day मूड फ्रेश करण्यासाठी हवी कॉफी

काहींना जसा चहा हवाहवासा वाटतो. तशीच कॉफीही आवडीची असते. तासनतास गप्पा मारायच्या असतील तर कॉफीच हवी. त्यामुळेच मित्र-मैत्रिणी, नातेवाईक खूप दिवसांनी भेटले की कॉफीची फर्माईश केली जाते. अनेक कपल्सही कॉफी पित एकमेकांना जाणून घेणे पसंत करतात. दीर्घ काळ चर्चा कॉफीमुळे रंगत असल्याने ती पिण्याचे प्रमाण वाढते आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात डालगोना कॉफी खूपच लोकप्रिय झाली होती. म्हणूनच आजचा जागतिक कॉफी दिवस हा कॉफी क्षेत्रातील विविधता, गुणवत्ता आणि उत्कटतेचा उत्सव आहे, असे मानले जात आहे.

कॉफी दिवस कसा सुरु झाला?

२०१४ मध्ये, आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेने (ICO) सर्व कॉफी प्रेमींना आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस समर्पित करण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये ICO ने मिलानमध्ये पहिला अधिकृत कॉफी डे लाँच केला. तथापि, जगातील विविध देश वर्षभर वेगवेगळ्या तारखांना त्यांचे स्वतःचे राष्ट्रीय कॉफी दिवस साजरे करतात.

World Coffee Day
TCS, Wipro, HDFC सह दिग्गज कंपन्यांचे 'वर्क फ्रॉम होम' बंद
international coffee day
international coffee day

कॉफी मुळची आफ्रिकेतली

तरतरी आणणारी ही कॉफी मुळची आफ्रिकेतली आहे. इथिओपियाच्या दक्षिणेला काफा संस्थानात कॉफीची पहिल्यांदा लागवड झाली. पंधराव्या शतकात ती इथिओपियातून अरबस्तानात आली. कावाह या अरबी शब्दापासून कॉफी शब्द रूढ झाला आहे. तेथे त्याला काहवा असेही म्हटले गेले. तुर्कस्तानला पोहोचल्यावर काहवाचे काहवे असे नाव झाले, पुढे डचांनी काहवेचे कोफी तर इंग्रजांनी कॉफी असे नामकरण केले. तेच आज प्रचलित आहे.

World Coffee Day
World Smile Day : हसतांय ना? हसायलाच पाहिजे...

भारतात कॉफी आली कशी?

१६०० सालच्या आसपास हाजी बाबा बुदान हे हज यात्रेकरू चिकमंगळूरला आलेय तिथेच झोपडी बांधून ते राहू लागले. तेथेच त्यांनी स्वतच्या वापरासाठी काही कॉफीच्या बीया पेरल्या. पुढे काही काळाने त्याने लावलेली झाडे एका ब्रिटिश माणसाने शोधून काढली. आज भारतात जी काही कॉफीची झाडे आहेत त्यातील जवळजवळ ६०/७० टक्के तरी या झाडांची आहेत. ब्रिटिशांनी १८४० साली भारतात कॉफीची शास्त्रशुद्ध लागवड करण्यास सुरूवात केली.

चार प्रकारच्या कॉफी बिया लोकप्रिय

१) अरेबिका ( Arabica)

२) रोबुस्टा (Robusta)

३) लिबरिका (Liberica)

४) एक्ससेल्सा (Excelsa)

चहापेक्षा महाग

सध्या कॉफीचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. साधी कॉफी ७० रुपयांच्या आसपास तर मोठ्या हॉटेल्समध्ये ती १०० ते १५० रूपयांपर्यंत मिळते. kopi luwak ही अत्यंत महागडी कॉफी समजली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com