

World Environment Day 2026
sakal
अतुल मांगे
वायू प्रदूषण म्हटले की वाहनांचा धूर, औद्योगिक प्रदूषण आणि कारखान्यांच्या चिमण्यांतून बाहेर पडणारे विषारी वायू डोळ्यांसमोर येतात. मात्र, जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण तज्ज्ञांनी एका गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधले. आपण ज्या घराला सुरक्षित आश्रयस्थान समजतो, त्याच घरातील हवा बाहेरील हवेपेक्षा दोन ते पाच पट अधिक प्रदूषित असू शकते. त्यामुळे घरगुती वायू प्रदूषण हा नागरिकांच्या आरोग्यासाठी वाढता धोका बनत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.