World Laughter Day 2022: जागतिक हास्य दिन का साजरा केला जातो; जाणून घ्या कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Laughter Day 2022
World Laughter Day 2022: जागतिक हास्य दिन का साजरा केला जातो; जाणून घ्या कारण

World Laughter Day 2022: जागतिक हास्य दिन का साजरा केला जातो; जाणून घ्या कारण

World Laughter Day 2022: चेहऱ्यावरील हास्य हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं वैभव आहे. हास्य आपल्याला सकारात्मक बनवतं. जगाला हास्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी मे महिन्याचा पहिला रविवार जगभरात 'जागतिक हास्य दिन' म्हणून साजरा केला जातो.

जागतिक हास्य दिन 1998 मध्ये पहिल्यांदा मुंबईत साजरा करण्यात आला जेव्हा हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी त्या चळवळीद्वारे एक सिद्धांत मांडला. हळूहळू उद्याने आणि मैदाने सकाळी हास्याच्या गर्जनेने भरू लागली. अशा प्रकारे लाफ्टर योगाच्या आगमनाने जागतिक हास्य दिनाचा जन्म झाला. (World Laughter Day 2022, History, Significance, and How to Celebrate it)

हेही वाचा: कोकण ते विदर्भ, असा आहे आपला महाराष्ट्र; जाणून घ्या खास गोष्टी

जागतिक हास्य दिनाचे महत्त्व-

आपल्या शारिरीक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळे लोक हसणं विसरु लागले आहेत. लोकांना हसण्याची आठवण करून देण्यासाठी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना हसवण्यासाठी प्रत्येक मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या असे आढळून आले आहे की हसण्यामुळे मेंदूतील कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

दिवस कसा साजरा करायचा?-

जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि मानवजातीमध्ये बंधुभाव आणि सौहार्द निर्माण व्हावा या उद्देशाने जागतिक हास्य दिनाची सुरुवात झाली. जागतिक हास्य दिनाची लोकप्रियता हास्य योग चळवळीतून जगभर पसरली. आज जगभरात सहा हजारांहून अधिक कॉमेडी क्लब आहेत. या निमित्ताने जगातील अनेक शहरांमध्ये रॅली, चर्चासत्रे आणि परिषदा आयोजित केल्या जातात.

हेही वाचा: Photo Story: यशवंतराव ते उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे 19 भाग्यविधाते मुख्यमंत्री

जागतिक हास्य दिन साजरा करणं, खूप सोपं आहे. कारण या दिवशी तुम्हाला फक्त हसायचं असते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर हसतंच राहावं, तुम्ही तुमच्या आनंदाला प्राधान्य दिले पाहिजे आणि तुमच्या सभोवतालचे लोक आनंदी आहेत की नाही याची खात्री करा. विनोद करा, खोड्या करा किंवा तुमचे मित्र आणि कुटुंबियांना भेट द्या, त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवा. तुम्ही हे सर्व केलं म्हणजेच जागतिक हास्य दिन साजरा करणं होय.

Web Title: World Laughter Day 2022 History Significance And How To Celebrate It

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :smile
go to top