World Lung Cancer Day 2022: हे आयुर्वेदिक पदार्थ दूर करेल तुमच्या फुप्फुसांमध्ये साचलेली घाण

फुप्फुसांना सशक्त आणि निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितल्या गेले आहे. त्याबाबत आपण आज जाणून घेऊया.
World Lung Cancer Day 2022
World Lung Cancer Day 2022esakal

दरवर्षी १ ऑगस्टला 'वर्ल्ड लंग कँसर डे' (World Lung Cancer Day) साजरा केला जातो. या दिवसाचं उद्देश्य म्हणजे लोकांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाबाबत जागरूकता वाढवणे. तसेच लोकांना त्यांच्या अशा सवयींबाबत सतर्क करणे ज्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. फुप्फुस हा शरीरातील एक असा महत्वाचा भाग आहे जो न थांबता सतत त्याचं काम सुरू ठेवतो. ऑक्सीजन शरीरासाठी सर्वात महत्वाचं ठरतं. फुप्फुसांद्वारेच शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

वाढतं प्रदूषण, धूळ, विषाणु या कारणांनी फुप्फुस कमकुवत होत जातात ज्यामुळे पुढे अस्थमा, श्वसनाच्या व्याधी यांसारख्या आजारांची सुरूवात होते. यामुळे फुप्फुसांत कफ जमा व्हायला सुरूवात होते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. फुप्फुसांना सशक्त ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितल्या गेले आहे. त्याबाबत आपण आज जाणून घेऊया.

पिपळी (Caterpillar Fungus)

पिपळी फुप्फुसांसाठी फार उपयोगी आहे. आणि श्वसनप्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी पिपळी फार महतवाची ठरते. आयुर्वेदानुसार पिपळी रोज दूधात एक एक वाढवत १५ दिवस घ्यावी आणि नंतर त्याच क्रमात घट करावी. यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते. सर्दी खोकल्याच्या वेळी पिपळी मधासोबत घेतल्याने श्वसनासंबंधीचे त्रास दूर होतात.

सूंठ

सूंठ म्हणजे वाळलेलं आलं. सूंठ फुप्फुसांमध्ये असलेली सूजन कमी करते. तसेच सूंठ फुप्फुसांच्या नळ्यांना साफ ठेवत त्यांचं कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. तसेच सूंठ रोगप्रतिकारक्षमता वाढवून फुप्फुसांवर आक्रमण करणाऱ्यांना आजारांना दूर ठेवते.

अक्रोड

अक्रोडला आयुर्वेदात महत्वाचा घटक द्रव्य मानला जातो. हे फळ कोरडा खोकला, सर्दीसाठी लाभदायी ठरतो. गळ्यातील सूजन कमी करून गळ्यातील कफ बाहेर काढण्यासही अक्रोड महत्वाचं ठरते.

ज्येष्ठमध

आयुर्वेदानुसार ज्येष्ठमध त्याच्या गोड आणि ठंड असण्याच्या गुणधर्मामुळे श्वसनासंबंधीच्या सगळ्या आजारांना आराम देते. गळ्यात आतपर्यंत जमलेल्या गाढ्या कफला विरघळवून श्वसनात येणाऱ्या अडचणी दूर करतो.

तुळशीची पानं

तुळशी ही एक औषधी वनस्पती आहे. तुळशी अनेक रोगांना मात देणारी वनस्पती ठरते. तुळशीच्या पानांमध्ये यूजेनॉल तत्वाचा पदार्थ बघितल्या गेला आहे. ज्यामुळे श्वसनासंबंधीच्या समस्या दूर होतात. नियमित तुळशीची पानं खाल्ल्याने रोगप्रतिकारक्षमता वाढते.

केमिकलयुक्त औषधी खाण्यापेक्षा आयुर्वेदातील काही उपाय तुम्ही नियमित केलेत तर नक्कीच तुमचेही आरोग्य निरोगी राहिल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com