World Milk Day 2024: आरोग्यासह चमकदार त्वचेसाठीही उपयुक्त आहे दूध, 'असा' बनवा कच्च्या दुधाचा फेस पॅक

Milk For Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी दुधापासून घरगुती फेसपॅक बनवू शकता.
World Milk Day 2024
World Milk Day 2024Sakal

Milk For Glowing Skin: दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे, बायोटिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लैक्टिक ऍसिड, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि प्रथिने यासारखे घटक असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की कच्चे दूध तुमच्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरू शकते.

चमकदार त्वचेसाठी कच्चे दूध वापरणे हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. हे वातावरणातील रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. तसेच त्वचा हायड्रेट ठेवते. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, बारिक रेषा कमी करण्यास मदत करते. कच्चे दूध कसे वापरावे हे जाणून घेऊया.

कच्च्या दूधाचा वापर पुढील पद्धतीने करता येतो

मॉइश्चरायझर

कच्च्या दुधात A, D, B6, B12, बायोटिन, कॅल्शियम यासारखे अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे त्वचेला पोषण मिळते. कच्च्या दुधामधील हे गुणधर्म त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चरायझर करण्यास मदत करते. यामुळे कोरडेपणा आणि खाज सुटण्याची समस्या कमी होते.

फेस पॅक बनवण्याची पद्धत-

दोन ते तीन चमचे थंड कच्चे दूध घ्या. नंतर त्यात अर्धा चमचा ग्लिसरीन घाला आणि चांगले मिक्स करा.

कॉटन बॉलच्या मदतीने हे मिश्रण चेहरा आणि ओठांवर लावा आणि 20-30 मिनिटानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

यामुळे तुमची त्वचा दिवसभर मॉइश्चराइज राहील.

क्लीन्सर कसे बनवावे

मेकअप, त्वचेच्या मृत पेशी, तेल आणि इतर प्रकारची अशुद्धता काढून टाकण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर क्लीन्सर म्हणून देखील करू शकता. कच्च्या दुधाचा फेस क्लीन्सर वापरणे हा एक उत्तम पर्याय आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कच्चे दूध क्लींजर नैसर्गिक आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

कसे वापरावे

दोन चमचे कच्चे दूध घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला आणि चांगले मिक्स करा.

आता त्यात कापसाचा गोळा बुडवा आणि हळूवारपणे तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेला दूध चोळा.

नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

World Milk Day 2024
World Milk Day 2024: सकाळी पोटभर नाश्ता करायचा असेल तर झटपट बनवा दुधाची दशमी

कच्च्या दुधाचा फेस मास्क

कच्च्या दुधाच्या फेस मास्कचा वापर केल्याने चेहरा चमकदार होतो. कच्च्या दुधात अनेक पोषक घटक असतात. काळे डाग आणि पॅच स्वच्छ करण्यास मदत करते.

कच्च्या दुधाचा फेस मास्क बनवण्याची पद्धत-

दोन चमचे कच्चे दूध घ्या आणि त्यात मुलतानी माती मिक्स करा आणि त्वचेवर लावा.

ते तुमच्या चेहऱ्यावर लावा, दोन मिनिटे मसाज करा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.

आता आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.

स्क्रब

कच्च्या दुधात असलेले लैक्टिक अॅसिड आणि प्रथिने एक्सफोलिएटिंग आणि हायड्रेटिंग एजंट म्हणून चांगले काम करतात. कच्च्या दुधाचा स्क्रब मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी, त्वचेचा रंग हलका करण्यासाठी आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे.

कच्च्या दुधाचा स्क्रब

दोन चमचे कच्चे दूध, एक चमचा साखर आणि 1 टेबलस्पून बेसन मिक्स करून पेस्ट बनवा.

ही पेस्ट तुमच्या त्वचेवर 10 मिनिटे मसाज करा आणि धुण्यापूर्वी 10 मिनिटे तशीच राहू द्या.

थंड पाण्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा.

तुमच्या चेहऱ्यावर आधीच कोणत्याही प्रकारची समस्या असेल किंवा तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर ते वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com