World Soil Day 2023: काहीकेल्या केस वाढत नाहीत? मग ट्राय करा शॅम्पू ऐवजी माती

केसांचं सौंदर्य वाढवायचंय? वापरा शॅम्पू ऐवजी माती
World Soil Day 2023: काहीकेल्या केस वाढत नाहीत? मग ट्राय करा शॅम्पू ऐवजी माती

केसांची काळजी घेत असताना आपण केस चमकदार आणि मऊ होण्यासाठी वेगवेगळ्या शॅम्पूचा वापर करतो. अलीकडे शॅम्पूसोबतच कंडिशनरचाही वापर केला जातो. बाजारात असलेल्या या वेगवेगळ्या उत्पादनामुळे केसांना तात्पुरती चमक येते.

मात्र कालांतराने या प्रोडक्ट्समधील केमिकल्सचा केसांवर विपरीत परिणाम होतो. यामुळे केस निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतात. तसंच केस गळणे, केस कमी वयातच पांढरे होणं अशा वेगवेगळ्या समस्या यामुळे उद्भवतात.

सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये नैसर्गिक गोष्टींना आजही विशेष महत्व आहे. यात त्वचेचं आणि केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी माती उपयुक्त ठरते असं सौंदर्य तज्ज्ञांचं मत आहे. त्यांमुळे मातीचे फेस पॅक, मातीने आंघोळ करण्याचे फायदे आहेत तसेच मातीने केस धुण्याचे आनेक फायदे आहेत.

केसांना माती लावून केस धुतल्यास शॅम्पूपेक्षाही चांगले परिणाम दिसून येतात.अर्थात केसांना लावण्याची माती ही विशिष्ट माती असते.

केसांची निगा राखण्यासाठी महागडी उत्पादनंच हवी हा केवळ एक गैरसमज आहे. केस चांगले राहाण्यासाठी केस नीट धुतले जाणं, टाळू स्वच्छ होणं खूप गरजेचं असतं.

World Soil Day 2023: काहीकेल्या केस वाढत नाहीत? मग ट्राय करा शॅम्पू ऐवजी माती
Hair Care: केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही लाकडी कंगवा वापरा, होतील जबरदस्त फायदे

कोणती माती वापरावी?

ग्रामीण भागातील अनेक महिला आजही केस धुण्यासाठी मातीचा उपयोग करतात. गावात केसांसाठीची शुध्द स्वरुपातली माती उपलब्ध असते. शहरी भागात ही सोय नाही. पण दुकानांमधे केस धुण्यासाठीची माती मिळते.

तीन प्रकारच्या मातीचा केस धुण्यासाठी उपयोग होतो. रहसॉल/गहसॉल, बेण्टोनाइट आणि काओलिन या तीन प्रकारच्या मातीचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. तसेच या तीन मातींचा उपयोग हेअर मास्क म्हणून केला तर केस छान होतात.

मातीने केस धुण्याचे फायदे

1. शॅम्पूनं केस धुतल्यानं केस आणि टाळू दोन्ही स्वच्छ होतात. पण शॅम्पूमधील रासायनिक घटकांमुळे केसांच्या मुळांचं अर्थात टाळूचं नुकसान होतं. पण केस धुण्यासाठी वरील तीनपैकी कोणतीही माती वापरली तरी केस आणि टाळूचं कोणतंही नुकसान न करता केस स्वच्छ होतात.

माती केसातील, टाळूतील घाण आणि विषारी घटक स्वत:कडे खेचून घेते. तेल लावल्यानं तेलकट झालेले, घामाने चिकट झालेले केस मातीच्या उपयोगानं छान सुळसुळीत होतात.

2. माती हा नैसर्गिक घटक आहे. मातीत अनेक खनिजं आणि पोषक तत्त्वं असतात. यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं. केस निरोगी असतील तरच केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. केसांची चमक वाढते. शॅम्पू लावून केस कोरडे होतात. मातीनं केस धुतल्यास केस मऊ होतात.

3. मातीमुळे केसातील अतिरिक्त तेल सहज निघून जातं. पण केसातील नैसर्गिक तेल आणि आद्रता मात्र केसात टिकून राहाते. यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. केस गळतीची समस्या सुटते.

केसांना माती लावताना ही काळजी घ्या

कोणतंही उत्पादन ते नैसर्गिक असो की रासायनिक, ते वापरताना आपल्याला सूट होतंय ना याची आधी खात्री करुन घ्यायला हवी. बाजारात मिळणारी माती केसांसाठी वापरताना आधी मातीची पेस्ट हाताच्या मनगटाला लावून पाहावी. आपल्या केसांसाठी कोणत्या प्रकारची माती उपयुक्त आहे याबाबत सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com