World Tuna Day : या माशांसाठी चक्क राखीव असतो आजचा दिवस; जाणून घ्या टूना माशांबद्दल रंजक माहिती

दरवर्षी २ मे हा दिवस जागतिक टूना दिवस म्हणून साजरा केला जातो.
World Tuna Day 2024
World Tuna Day 2024Sakal

दरवर्षी 2 मे रोजी जागतिक टूना दिवस साजरा केला जोतो. टूना माशाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी (UN) या दिवसाची स्थापना केली आहे. 2017 मध्ये प्रथमच साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, जगातील अनेक देश अन्न सुरक्षा आणि पोषण या दोन्हीसाठी टूना माशांवर अवलंबून आहेत. टूना मत्स्यपालन सध्या 96 पेक्षा जास्त देशांमध्ये केले जाते आणि त्यांची क्षमता सतत वाढत आहे.

जागतिक टूना दिवसाचा इतिहास काय?

डिसेंबर 2016 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (UNGA) ठराव 71/124 स्वीकारून जागतिक टूना दिवस अधिकृतपणे घोषित केला. हा दिवस प्रामुख्याने टूना माशांची भूमिका आणि अनियंत्रित मासेमारी पद्धती आणि खराब संवर्धन व्यवस्थापनामुळे त्यांची लोकसंख्या कमी होत आहे याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी घोषित करण्यात आला आहे.

हा मासा धोक्यात का आला आहे?

टुना मासाला जगभरात प्रचंड मागणी आहे. प्रत्येक देशात याचे सर्वाधिक ग्राहक आहेत, त्यामुळे गेल्या काही वर्षांत लोकांच्या मागणीच्या तुलनेत मासळीच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला असून, त्यानंतर या माशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मानवी गरजा भागवता याव्यात यासाठी या माशाची जगभरात मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते, मात्र दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत या माशाची शिकार झपाट्याने वाढल्याने तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

World Tuna Day 2024
'सीपीआर'मुळे मिळू शकतं जीवदान, सर्वांनीच शिकून घेणं गरजेचं.. जाणून घ्या महत्व

टूना मासा कुठे आढळतो?

टूना मासा सर्वात जास्त भूमध्य समुद्र, अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरात आढळतो. टूनाच्या 40 हून अधिक प्रजाती आहेत परंतु टूनाच्या सततच्या शिकारीमुळे हा मासा आता नामशेष होत चालला आहे. हा मासा नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी दरवर्षी 2 मे रोजी 'जागतिक टूना दिवस' साजरा केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com