पालकांनो... मुलांना ‘नाही’ म्हणू नका, चुकांमधून शिकू द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

writer Rajeev Tambe Guide to parents says let children learn from mistakes

पालकांनो... मुलांना ‘नाही’ म्हणू नका, चुकांमधून शिकू द्या

पुणे : चिकूपिकूतर्फे शनिवारी १७ सप्टेंबर रोजी ‘पालकांची शाळा’ ही कार्यशाळा पालकांसाठी आयोजित करण्यात आली होती. मुलांशी वागताना पालकांनी मुलांशी कसं बोलावं, कसं वागावं, काय करावं, काय करू नये आणि हसत-खेळतच मुलांमधील नेहमीच्या खेळण्याचा अधिक सर्जक वापर कसा करावा अशा विविध मुद्द्यांवर लेखक आणि बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी पालकांना मार्गदर्शन करत संवाद साधला.

तीन ते सहा या वयोगटातील मुलं लहान असली तरीही त्यांच्या अंगात तितकीच प्रचंड उर्जा असते, शिकण्याची, आकलन करण्याची क्षमता जास्त असते. अशा वयातील मुलांना वाढवताना पालकांना बरेच प्रश्न पडतात. या वयात मुलांशी छानसा संवाद साधत मुलांना समजून घेण्याची जास्त गरज असते. अशावेळी बाहेर गेल्यावर मुलांच्या अनुभवात अधिक भर कशी घालता येईल, काय हाताळायला द्यावे, बोलता बोलता, खेळातून मुलांचा शब्दसंग्रह कसा वाढवावा, एखाद्या गोष्टीला ‘नाही’ न म्हणता मुलांना ती गोष्ट करू द्यावी, चुकांमधून शिकू द्यावे आणि त्यांच्या शिकण्याच्या कृतीला शाब्बाशकी द्यावी, त्यांचा आत्मविश्वास वाढू द्यावा. मुलं जर खूप कल्पना करत असतील तर त्यांच्यातील कल्पकतेला वाव द्या. मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीत रमू द्या, त्यांना अधिक कल्पक बनण्यास गोष्टींमधून मदत करा, असेही राजीव तांबे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: नैराश्यातून 'एमपीएससी' करणाऱ्या आणखी एका तरुणाने संपवलं जीवन, पुण्यातील घटना

मुलांच्या बालपणात सामील होऊन आनंदाने पालकत्वाची जवाबदारी ही सहज-सोपी कशी करता येईल हे हसत-खेळत या कार्यशाळेतून पालकांना जाणून घेता आले.

हेही वाचा: IIT Bombay : मोहालीनंतर IIT मुंबईत मुलीचा व्हिडिओ काढण्याचा प्रकार, एकाला अटक

Web Title: Writer Rajeev Tambe Guide To Parents Says Let Children Learn From Mistakes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..