शस्त्रक्रियेविना फ्लफी ओठ बनवायचेत का? ट्राय करा नैसर्गिक पद्धतीच्या 'या' ट्रिक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शस्त्रक्रियेविना फ्लफी ओठ बनवायचेत का? ट्राय करा नैसर्गिक पद्धतीच्या 'या' ट्रिक्स

शस्त्रक्रियेविना फ्लफी ओठ बनवायचेत का? ट्राय करा नैसर्गिक पद्धतीच्या 'या' ट्रिक्स

आधुनिक काळात फ्लफी ओठ ठेवण्याचा आणि त्यावर डार्क शेडच्या लिपस्टिक लावण्याचा ट्रेंड वाढत आहे. अनेक स्त्रियांना लूक उठावदार दिसण्यासाठी फ्लफी ओठ हवे असतात. यासाठी अनेक महिला प्लास्टिक सर्जरीचा अवलंबही करतात. मात्र, प्लास्टिक सर्जरीचेही अनेक तोटे असू शकतात. त्यामुळे, शस्त्रक्रियेचा अवलंब न करणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

तुम्हाला तुमचे ओठ फ्लफी करायचे असतील तर त्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तुमचे ओठ फ्लफीआणि सुंदर करु शकता. कसे ते पाहूया...शस्त्रक्रियेशिवाय ओठ फ्लफी करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही उपायांचा अवलंब करू शकता. मात्र हे करत असताना एक लक्षात ठेवा की त्याचा परिणाम हा हळूहळू दिसून येईल.

हेही वाचा: Health : गरम पदार्थांमध्ये लिंबू किंवा लिंबूचा रस टाकू नये, कारण...

पेपरमिंट तेल

ओठ मोकळे आणि छान दिसण्यासाठी तुम्ही पेपरमिंट ऑइलचा वापर करा. पेपरमिंट ऑइलच्या वापरामुळे ओठांमध्ये सूक्ष्म रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे तुम्हाला ओठ सुन्न झाल्यासारखे वाटते. यामुळे तुमचे ओठ हळूहळू फुगवलेले दिसू लागतात. ओठांमध्ये रक्ताभिसरण वाढल्यामुळे ओठ फुगलेले असल्यासारखे दिसू शकतात.

दालचिनी तेलाचा वापर

ओठ मोकळे दिसण्यासाठी दालचिनीच्या तेलाचा वापर करा. हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. ते वापरण्यासाठी दालचिनीच्या तेलात थोडासा लिपबाम मिसळा. त्यानंतर हे मिश्रण ओठांवर लावा. यामुळे तुमचे ओठ फ्लफी दिसू शकतात.

हेही वाचा: सुट्टीला मुलांसोबत फिरायचंय का?, मग 'ही' प्रसिद्ध प्राणीसंग्रहालय नक्की पहा..

जास्त पाणी प्या

ओठांना नैसर्गिकरीत्या फ्लफी करण्यासाठी भरपूर पाणी प्या. यामुळे तुमचे ओठ फ्लफी दिसू लागतील. अनेकवेळा कमी पाणी प्यायल्याने तुमचे शरीर हायड्रेट राहते. त्यामुळे ओठ कोरडे आणि निर्जीव दिसत नाहीत. या प्रकरणात ओठ फ्लिपी दिसू शकतात.

Web Title: You Make Your Lips Look Fuller Beauty Tips To Women For Without Surgery

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..