Parenting Tips: तुमची मुलं पुरेशी झोप घेत नाहीत? होऊ शकतं 'हे' नुकसान

फक्त आहारच नाही तर मुलांच्या आरोग्यासाठी झोपही महत्त्वाची आहे.
Kids Sleep Timing
Kids Sleep Timing Sakal

Parenting Tips: शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पूर्ण झोप अत्यावश्यक असते. मानसिक विकासाचा संबंध झोपेशी आहे. झोपेत असताना रात्री अचानक उठणे, झोपताना चिडचिड करणे अथवा हट्ट करणे ह्या समस्यांना सामोरे जाणे पालकांना नवीन नाही. पण मुलं असे का वागतात याकडे आई-वडिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण काहीवेळा आजारही झोप न येण्यासाठी कारणीभूत असू शकते. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी मुलांना पुरेशी झोप आवश्यक आहे.

मुलांना झोप का येत नाही?

  • भयानक स्वप्नांची भीती

  • अंधार व रात्रीची मनात भरलेली धास्ती

  • एखाद्या गोष्टीची चिंता किंवा तणाव

  • औषधींचे दुष्परिणाम झाल्यास

  • अस्थमा, स्लीप एपनिया, कान किंवा दातांचे

  • इन्फेक्शन आदी वैद्यकीय समस्या

Kids Sleep Timing
Summer Food Tips : उन्हाळ्यात अन्न खराब होतेय! अशी घ्या काळजी

झोप, वातावरणाचा जवळचा संबंध-

  • झोपण्याचे ठिकाण शांत असावे

  • आरामदायक बेड असावा आणि कपडे

  • डिम्ड लाईटची व्यवस्था असावी

  • रुममधील तापमान मेंटेन ठेवावे

  • झोपण्याची निश्चित वेळ असावी

  • झोपीच्या वेळी मोबाईल, टीव्ही व कॉम्प्युटर टाळावे

Kids Sleep Timing
Parenting Tips: मुलांना घरी एकटे सोडण्यापूर्वी करा 'हा' होमवर्क

हे करू नये-

  • उपाशीपोटी झोपवू नये

  • मुलांच्या समोर भांडण करू नये

  • कॉफी, चाय, सॉफ्ट ड्रिंकचे सेवन टाळावे

  • मुलांना पोटावर झोपवू नये.

  • श्वसन प्रक्रियेत बाधा येऊ शकते

झोपेचे फायदे : झोप पूर्ण झाल्यास मुलांचे मन शांत होते, चिडचिड थांबते निरोगी आणि स्वस्थ राहतात पचन क्रिया सुरळीत होते थकवा दूर पळतो मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होतो स्मरणशक्ती वाढते

"रात्री १० ते सकाळी ४ पर्यंतची झोप ही मेंदूसाठी सर्वात महत्वाची असते. या वेळी ग्रोथ हार्मोन तयार होतात. शरिराच्या वाढीसाठी झोप आवश्यक असते. पुरेशी झोप नसल्यास मुलांचे लक्ष विचलित होते. किंबहुना, मानसिक आजारही होऊ शकतो. झोपेची समस्या फारच जास्त असेल तर त्वरित डॅाक्टरांशी संपर्क साधावा," असं नागपूर येथील बालरोगतज्ञ डॉ. स्वाती वाघमारे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com