Marathi News Live Updates : सोलापुरात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आयोजकाविरोधात गुन्हा दाखल, शिलाई मशीन आणि अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम भोवला

Breaking Marathi News Live Update : महाराष्ट्र, पुणे, राजकारण, देश-विदेश, हवामान आणि महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचा दिवसभर लाईव्ह ब्लॉगमध्ये.
Breaking Marathi News live Updates
Breaking Marathi News live Updatesesakal

Solapur Live सोलापुरात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आयोजकाविरोधात गुन्हा दाखल, शिलाई मशीन आणि अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम भोवला

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक शाहजूर चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्तावीस सप्टेंबर रोजी सब्र व सोशल समूहाच्या वतीने शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्याने अशा कार्यक्रमासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, कोणतीही परवानगी न घेता शिलाई मशीन वाटप, अन्नधान्य वाटप तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक काळात अशा प्रकारचे कार्यक्रम घेणे आचारसंहितेचा भंग असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली. या कार्यक्रमाला एमआयएम पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते, तसेच पक्षाच्या फलकांचाही वापर करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com