Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

यामध्ये १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९३ मतदारसंघाचा समावेश होता.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal

3rd Phase Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यामध्ये १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९३ मतदारसंघाचा समावेश होता. यामध्ये सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजता मतदान संपलं तेव्हा देशभरात सुमारे ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात याच वेळेत ५४.०९ टक्के मतदान पार पडलं. (3rd Phase Loksabha Election 2024 61 percent voting across country and 54.09 percent in Maharashtra)

Lok Sabha Election 2024
ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

आज तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघ, गुजरातमधील २५, उत्तर प्रदेशातील १०, कर्नाटकातील १४, मध्य प्रदेशातील ९, छत्तीसगडमधील ७, बिहारमधील ५, आसाम ४, पश्चिम बंगालमधील ४, गोव्यातील २ आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांचा समावेश होता. यांपैकी देशभरात सर्वाधिक मतदान ७५.०१ आसाममध्ये झालं तर सर्वात कमी मतदान ५४.०९ टक्के मतदान महाराष्ट्रात झालं. (Marathi Tajya Batmya)

Lok Sabha Election 2024
EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

दरम्यान, यामध्ये महाराष्ट्रातील बारामती, कोल्हापूर, सांगली या चर्चेतील लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडलं. यांपैकी बारामतीत सर्वात कमी ४७.८४ टक्के, कोल्हापुरात ६३.७१ तर ५२.५६ टक्के मतदान झालं. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात किती झालं मतदान?

 1. लातूर - ५५.३८ टक्के

 2. सांगली - ५२.५६ टक्के

 3. बारामती - ४७.८४ टक्के

 4. हातकणंगले - ६२.१८ टक्के

 5. कोल्हापूर - ६३.७१ टक्के

 6. माढा - ५०.०० टक्के

 7. उस्मानाबाद - ५६.८४ टक्के

 8. रायगड - ५०.३१ टक्के

 9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - ५४.७५ टक्के

 10. सातारा - ५४.७४ टक्के

 11. सोलापूर - ४९.१७ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.