Beed Loksabha Voting : अबब.. ७२ टक्के मतदान! ; पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे यांच्यामध्ये सरळ लढत

महाष्ट्रात सर्वाधिक आणि जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक ७२ टक्के मतदानाची नोंद जिल्ह्यात झाली. सोमवारी (ता.१३) सायंकाळी प्रशासनाने सहापर्यंत ६८ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जाहीर केली.
Beed Loksabha Voting
Beed Loksabha Votingsakal

बीड : महाष्ट्रात सर्वाधिक आणि जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक ७२ टक्के मतदानाची नोंद जिल्ह्यात झाली. सोमवारी (ता.१३) सायंकाळी प्रशासनाने सहापर्यंत ६८ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी जाहीर केली. मात्र, उशिरापर्यंत हाच आकडा ७२ टक्क्यांवर पोचला.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे तसेच वंचितचे अशोक हिंगे यांच्यासह ४१ उमेदवार रिंगणात होते. मात्र, मुंडे व सोनवणे यांच्यात सरळ लढत होत आहे. तर, परळी मतदारसंघातील सर्वोच्च टक्केवारी आणि विशिष्ट बूथवर विशिष्ट वेळेत मतदानाचा वाढलेला टक्कादेखील काही विचार करायला भाग पाडत आहे.

Beed Loksabha Voting
Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांनी बॅगांमधून १२ कोटी आणले! ;संजय राऊत यांचा ‘एक्स’वरून थेट आरोप

निवडणूक निकाल व मतदानाचे विश्‍लेषण करणाऱ्या जाणकारांना देखील आता वाढत्या मतांच्या टक्क्यांबरोबरच परळी व आष्टीतील वाढत्या मतदानामुळे कोड्यात टाकले आहे. काही ठिकाणी मतदारांनी केलेल्या तक्रारींकडे मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांनी सपशेल डोळेझाक केली. एकीकडे मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनही सतर्क व प्रयत्नशील होते.

उमेदवारांनीही कसोशीने प्रयत्न केले. परंतु, महाराष्ट्रात कुठे नाही तेवढे मतदान आणि एकाच ठिकाणी अशी मोठी आकडेवारी यामुळे गोंधळाचे वातावरण आहे. त्याला उमेदवार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेरमतदानाची तक्रार करून अधिकच बळ दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com