Abhishek Singhvi : ‘ईडी’च्या छाप्यांमुळेच भाजपकडे आला पैसा ; अभिषेक मनु सिंघवी यांचा आरोप,संविधानाच्या ढाच्यावरच आघात

मोदी सरकारने सीबीआय, ईडी आणि निवडणूक आयोग यासारख्या यंत्रणा स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवल्या आहेत. निवडणूक रोख्यांची (इलेक्ट्रोल बाँड) यादी पाहिल्यास ईडीच्या छाप्यानंतर अनेकांनी भाजपला निधी दिल्याचे चित्र स्पष्ट होते.
Abhishek Singhvi
Abhishek Singhvi sakal

पुणे : ‘‘मोदी सरकारने सीबीआय, ईडी आणि निवडणूक आयोग यासारख्या यंत्रणा स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवल्या आहेत. निवडणूक रोख्यांची (इलेक्ट्रोल बाँड) यादी पाहिल्यास ईडीच्या छाप्यानंतर अनेकांनी भाजपला निधी दिल्याचे चित्र स्पष्ट होते. सीबीआय, ईडीचा दुरुपयोग राजकीय द्वेषापोटी केला जात आहे. भाजपकडून संविधानाच्या मूळ ढाच्यावरच आघात केला जात आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात सिंघवी बोलत होते. ते म्हणाले,‘‘वादविवाद घडविणारा, त्रासदायक ठरणारा संविधानाचा ढाचा सरकारने तयार केला आहे. सध्या सरकारकडून आणखी एक नवीन व्यवस्था अवलंबली जात आहे. निवडणुकीचे ‘सिलेक्शन’मध्ये रूपांतर होत आहे. सुरतमध्ये अन्य उमेदवारांनी माघार कशी काय घेतली. हे असेच सुरू राहिल्यास निवडणुकीची गरज पडणार नाही आणि तो लोकशाहीचा अंत असेल. प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा केला जाणारा सरकारचा प्रयत्न भयावह आहे.’’

लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असल्याचे खुद्द मोदीच सातत्याने बोलत असल्याचेही सिंघवी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘सध्याच्या भाजपने जुन्या भाजपची ओळख मिटवून टाकली आहे. सध्या देशात नियंत्रित लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधानांना ते शोभत नाही. भाजपचा ‘४०० पार’ असे सातत्याने म्हणणे म्हणजे संसदेचा ढाचा बदलण्याचा प्रयत्न आहे.’’

Abhishek Singhvi
Loksabha Election : भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे ‘मविआ’समोर आव्हान

सिंघवी म्हणाले...

  • देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या वक्तव्यांत हिंदू-मुस्लिमांशिवाय दुसरे काहीच नाही.

  • गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने लोकशाही धोक्यात आणली

  • एकाचवेळी संसदेत १४२ खासदार निलंबित करणे म्हणजे लोकशाहीला धक्का

  • लोकशाहीची सर्व मूलतत्त्वे मोदींना हाणून पाडायची आहेत.

भाजपने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावामुळे सध्या काल्पनिक बहुमत बनविले आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होणार असून लोकसभा निवडणुकीचे निकाल हे धक्कादायक असतील. महाराष्ट्रात तर चित्रच बदलेल. पंतप्रधान होण्यासाठी इंडिया आघाडीकडे अनेक उमेदवार आहेत. परंतु दुर्दैवाने भाजपकडून केवळ एकाशिवाय अन्य कोणीही पंतप्रधानपदावर दावा करू शकत नाही.

- अभिषेक मनु सिंघवी, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com