Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

गुरुवारी रात्रीपासून उद्धव ठाकरे हे हॉटेल 'रामा' येथे मुक्कामी आहेत. त्याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी आलेले अभिनेता गोविंदाही रात्रीपासून मुक्कामी आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्याही रूम्स एकाच मजल्यावर होत्या...
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray esakal

Loksabha election 2024 : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. चौथ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना या मतदारसंघांसाठी मतदान होईल. सर्वच पक्षाचे नेते मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. याच गडबडीत उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेत दाखल झालेल्या अभिनेता गोविंदाची तारांबळ उडाली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिनेता गोविंदाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे २० मिनिटे हॉटेलबाहेर थांबावं लागलं. गोविंदाला त्याच्या रूमपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली होती.

त्याचं झालं असं की, गुरुवारी रात्रीपासून उद्धव ठाकरे हे हॉटेल 'रामा' येथे मुक्कामी आहेत. त्याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी आलेले अभिनेता गोविंदाही रात्रीपासून मुक्कामी आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्याही रूम्स एकाच मजल्यावर आहेत.

Uddhav Thackeray
Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

शुक्रवारी दुपारी गोविंदा हॉटेलमधून बाहेर पडून शहरात गेले होते. त्यानंतर दुपारी पावणे तीनच्या सुमारास ते हॉटेलच्या गेटवर पोहचले, मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे हे जालन्याच्या सभेला जाण्यासाठी रवाना होत असल्याने धावपळ सुरू झाली होती. गोविंदा यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना हे कळल्यानंतर गोविंदाला त्यांनी हॉटेलच्या बाहेर आडोशाला थांबवले. पण उद्धव ठाकरे हे काही लवकर बाहेर पडले नाहीत.

Uddhav Thackeray
Mallikarjun Kharge: मतदानाच्या टक्केवारीत अनेकदा बदल, खर्गेंनी व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगानं फटकारलं

शेवटी २० मिनिटे वाट पाहून गोविंदा हॉटेलमध्ये येऊन रूममध्ये न जाता रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथेही त्यांना १५ ते २० मिनिटे थांबावे लागले. थोड्या वेळेनंतर उद्धव ठाकरे हे रूममधून बाहेर पडण्याचा अंदाज घेऊन गोविंदा आपल्या रूममध्ये गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com