Mallikarjun Kharge Interview
Mallikarjun Kharge Interviewsakal

Mallikarjun Kharge: मतदानाच्या टक्केवारीत अनेकदा बदल, खर्गेंनी व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगानं फटकारलं

लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यांमधील मतदानाची अंतिम टक्केवारी तीनदा अपडेट झाल्यानं विरोधक आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यांमधील मतदानाची अंतिम टक्केवारी तीनदा अपडेट झाल्यानं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी यात फेरफार झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांच्या या विधानावरुन आता निवडणूक आयोगानं त्यांना फटकारलं आहे. खर्गेंच्या विधानामुळं मतदारांमध्ये निवडणुकीसंदर्भात नकारात्मकता निर्माण होऊ शकते असं आयोगानं म्हटलं आहे. (ECI today castigated Congress president Mallikarjun Kharge for obstructing ongoing Lok Sabha Elections2024)

खर्गे काय म्हणाले होते?

मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या मतदानाच्या आकड्यांवर प्रश्न उपस्थित केला होता. पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, निवडणुकीच्या टक्केवारीत फेरफार झाल्याचा संशय आहे. या फेरफाराविरोधात नेत्यांनी आवाज उठवायला हवा. Latest Marathi News

आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिल्या दोन टप्प्यातील मतदानामुळं सध्या मोदी आणि भाजप अस्वस्थ आहे. संपूर्ण देशाला वाटतंय की, हुकुमशाहीचं सरकार सत्तेच्या नशेत धुंद आहे. आपली खुर्ची वाचवण्यासाठी ते कुठलीही पातळी गाठू शकतात. पण आपला एकच उद्देश आहे तो म्हणजे संविधानाचं संरक्षण आणि लोकशाहीच्या संस्कृतीचं संरक्षण करणं हे आहे.

Mallikarjun Kharge Interview
Jalna Lok Sabha: तीन दिवसांनी मतदान अन् शेकडो मतदान कार्ड कचऱ्यात! जालन्यातील धक्कादायक प्रकार

निवडणुकीच्या आकडेवारीत नेमकं काय झालं?

लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यातील मतदानाची टक्केवारी आणि डेटा शेअर करण्यात उशीर झाल्यानं विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. पहिल्या दोन टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी होती. पण निवडणूक आयोगानं काही तासांनंतर ही टक्केवारीची आकडेवारी अपडेट केली. यामध्ये ५ ते ६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. यावरुन विरोधीपक्षांनी प्रश्न उपस्थित केला की ही आकडेवारी द्यायला इतका उशीर का झाला? यात काही घोटाळा तर नाही ना? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com