Aditya Thackeray : 'भाजपला संविधान बदलायचंय, डॉ. आंबेडकरांनी दिलेली आरक्षणे काढून घेण्याचा त्यांचा डाव आहे'

भाजपने (BJP) आजपर्यंत देशवासीयांना फसवण्याचेच काम केले आहे.
Aditya Thackeray Mahavikas Aghadi Prachar Sabha Sawantwadi
Aditya Thackeray Mahavikas Aghadi Prachar Sabha Sawantwadi esakal
Summary

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.

सावंतवाडी : देशभरात आज परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. तानाशाही आणि हुकूमशाहीला जनता कंटाळली आहे. हे चित्र पाहून भाजप हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) कार्ड वापरण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्यांचं हे कार्ड आता चालणार नाही, असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आज येथे व्यक्त केला. येणाऱ्या सात तारखेला कोकणचा विकास करणाऱ्या विनायक राऊत यांच्या नावासमोरील ‘मशाल’ चिन्हाचे बटन दाबून देशाचा अंधःकार व महाराष्ट्रावरील संकट दूर करा, असे आवाहनही त्यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या प्रचारार्थ येथील गांधी चौकात सभा झाली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, नेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, अतुल रावराणे, संदेश पारकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेस नेते विकास सावंत, कमलताई परुळेकर, साक्षी वंजारी, अण्णा केसरकर, अॅड. दिलीप नार्वेकर, जान्हवी सावंत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Aditya Thackeray Mahavikas Aghadi Prachar Sabha Sawantwadi
Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

ठाकरे म्हणाले, ‘‘भाजपने (BJP) आजपर्यंत देशवासीयांना फसवण्याचेच काम केले आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी जनतेला विविध आश्वासने दिली म्हणून ती ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत. आज सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमातून सर्व पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे हे ४०० पारच्या दावा करत आहेत; परंतु जनतेचा रोष लक्षात घेता त्यांना २०० पार करणेही कठीण आहे. आज महागाई प्रचंड वाढली आहे. सर्वसामन्य त्यात होरपळून निघत आहे. दुसरीकडे महिलांवर अत्याचार वाढले आहेत.

आता नागरिक म्हणून आपण देश कुठे चालला आहे, हे पाहणे गरजेचे आहे. भाजपला संविधान बदलायचं आहे. या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी दिलेली आरक्षणे काढून घेण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांना देशभक्ती महत्त्वाची नसून सत्ता महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन लढा देण्याची खरी गरज आहे.’’

Aditya Thackeray Mahavikas Aghadi Prachar Sabha Sawantwadi
Satara Lok Sabha : '..तसं नाही केलं तर पवारांची औलाद सांगणार नाही'; कोणाला उद्देशून म्हणाले अजितदादा?

ते म्हणाले, ‘‘सत्तेत राहून ओरबडण्याची भूक आजही भागली नसल्याने नारायण राणे आणि दीपक केसरकर एकत्र आले आहेत; परंतु ते एकत्र आले तरी मनापासून एकत्र आलेले नाहीत. ज्या विकासाच्या नावावर ते एकत्र आल्याचे सांगत असतील तर त्यांनी वेदांत गुजरातला नेताना आवाज का उठवला नाही? अनेक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेले आहेत; परंतु दोघेही तोंडातून ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. विनायक राऊत यांनी खासदारकीच्या दहा वर्षांच्या काळात केवळ आणि केवळ कोकणचा विकासाचा ध्यास पाहिला. त्यांनी दहा वर्षांत एवढी मेहनत घेतली तेवढी मेहनत कोणीही घेतली नाही. त्यामुळे कोकणातून जमिनी लुटणाऱ्यांना आपण मतदान करणार की कोकणचा विकास करणाऱ्या विनायक राऊतांना निवडून आणणार हे ठरविणे गरजेचे आहे.’’

उमेदवार राऊत म्हणाले, ‘‘आज या ठिकाणी अभद्र युती पाहायला मिळत आहे. दहशतवाद, दादागिरी संपवली असे म्हणणारे आज एकमेकांना घट्ट मिठी मारत आहेत; परंतु यांची ही मिठी सिंधुदुर्ग जिल्हा मायनिंगच्या घशात घालण्यासाठी आहे; मात्र हे एकत्र आले तरी भूमिपुत्र या नात्याने येथील जमिनीचे रक्षण करण्यासाठी मी शेवटपर्यंत लढा देईन. फक्त येणाऱ्या सात तारखेला ‘मशाल’ या चिन्हा समोरील बटन दाबून तुमचे मतरुपी आशीर्वाद द्या.’’ यावेळी व्यासपीठावरील शिवसेनेच्या नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.

Aditya Thackeray Mahavikas Aghadi Prachar Sabha Sawantwadi
तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. प्रचाराच्या तोफा रविवारी (ता. ५) थंडावणार आहेत. शेवटच्या टप्प्यात महायुतीकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या तर महाविकास आघाडीकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com