Arvind Kejriwal: तुरुंगातून बाहेत येताच केजरीवालांचं मोदींना थेट आव्हान! उद्या घेणार पत्रकार परिषद

यावेळी त्यांनी जनतेला हुकुमशाहीविरोधात एकजुटीनं लढण्याचं आवाहन केलं.
Arvind Kejariwal
Arvind Kejariwal

नवी दिल्ली : दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळ्यात ईडीनं अटक केल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केल्यानं अखेर तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर येताच त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे. याबाबत आता ते उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. (After coming out of Tihar Jail Arvind Kejriwal gave direct challenge to PM Modi and announced to get press conference tomorrow)

केजरीवाल म्हणाले, आमचा देश ४००० वर्षे जुना आहे. पण जेव्हा कोणी देशावर हुकुमशाही थोपवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लोक ते सहन करत नाहीत. सध्या देश हुकुमशाहीच्या काळातून जात आहे. मी या हुकूमशाहीसह सध्या लढत आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपल्या सरकारी निवासस्थानी जात असताना आपल्या समर्थकांना संबोधित करताना केजरीवाल बोलत होते.

दरम्यान, यावेळी केजरीवाल यांनी आपण उद्या पत्रकार परिषद घेणार असून यामध्ये आपली भूमिका मांडणार असल्याचं जाहीर केलं. दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.

Arvind Kejariwal
Jalna Lok Sabha: तीन दिवसांनी मतदान अन् शेकडो मतदान कार्ड कचऱ्यात! जालन्यातील धक्कादायक प्रकार

केजरीवाल पुढे म्हणाले, मला तुम्हा सर्वांना धन्यवाद द्यायचे आहेत. देशातील कोट्यवधी लोकांनी माझ्या सुटकेसाठी प्रार्थना केली. मला सुप्रीम कोर्टाचे देखील आभार मानायचे आहेत की सुप्रीम कोर्टामुळेच मी आज तुमच्यासमोर उभा आहे. मला फक्त तुम्हा सर्वांना एक विनंती करायची आहे की, आपण सर्वांनी मिळून या हुकुमशाहीविरोधात लढा द्यायचा आहे. माझ्यासोबत जे काही आहे त्यासह मी स्वतः तर या हुकुमशाहीविरोधात लढत आहे, आंदोलन करत आहे. पण आता १४० कोटी देशवासियांनी या हुकुमशाहीविरोधात लढायला हवं, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.

Arvind Kejariwal
Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते त्यांच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपच्या दिल्लीतील मंत्री आतिषी आणि सौरभ भारद्वाज आणि आपचे सरचिटणीस संदीप पाठक होते.

ईडीनं २१ मार्च २०२४ रोजी अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून चौकशीनंतर अटक केली होती. त्यानंतर आत्तापर्यंत ५० दिवस केजरीवाल हे तिहार तुरुंगात होते. दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं त्यांना ९ वेळा समन्स पाठवले होते त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com