Sujay Vikhe-Patil : जात्यावर बसलं की ओव्या सुचतात ! ; सुजय विखेंच्या वक्तव्यानंतर आजोबांच्या शिक्षणविषयक मताची चर्चा

‘पाठांतर करून फाडफाड इंग्रजी बोलून दाखवा, अर्ज भरणार नाही’, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आणि सोशल मीडियावर ते ट्रोल झाले. माजी आमदार नीलेश लंकेंनी त्यांना उत्तरही दिले.
Sujay Vikhe-Patil
Sujay Vikhe-Patilsakal

अहमदनगर : ‘पाठांतर करून फाडफाड इंग्रजी बोलून दाखवा, अर्ज भरणार नाही’, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आणि सोशल मीडियावर ते ट्रोल झाले. माजी आमदार नीलेश लंकेंनी त्यांना उत्तरही दिले. पण, संसदेत जाताना इंग्रजी आणि हिंदीविषयी पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे विचार काय होते, हे पाहणेही महत्त्वाचे आहे. ‘देह वेचावा कारणी’ (पृष्ठ ३२८) या बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्रात संसद सदस्य होताना त्यांनी इंग्रजी आणि हिंदीविषयी महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले होते.

१९७१ रोजीच्या मुदतपूर्व निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. कोपरगाव लोकसभा मतदाससंघातून बी. जे. खताळ आणि माजी आमदार शंकरराव काळे यांच्यासह भलेभले नेते येथून लढायला तयार नव्हते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी विठ्ठलराव विखे पाटील यांना बोलावून घेतले होते. यशवंतराव म्हणाले की, काय करायचे! विखे पाटील? कोणाला उभे करायचे? जिल्ह्याचा एकही पुढारी उभा रहायला तयार नाही. सगळ्यांनाच आमदार व्हायचंय. आता तुम्ही उभे रहा.

त्यावर विठ्ठलराव म्हणाले, ‘‘साहेब, मी बरा आहे इथंच! माझा नाना पाटील होईल. मला इंग्रजी ना कळतं ना हिंदीही! भाषण करता येणार नाही. नाना पाटील एवढा कर्तबगार. पण, दिल्लीत बिचारा प्रभाव पाडू शकला नाही. तेथे इंग्रजी येणाराच पाहिजे. पण, मला एक कळत नाही. अण्णासाहेब, मतदारसंघ का बदलतो.

आम्ही आहोत ना निवडून आणायला.’’ त्यावर यशवंतराव म्हणाले होते की, ते मला नाही सांगता यायचं. पण, त्यांची अजिबात इच्छा नाही. ते नकोच म्हणतात, उत्तरेत उभं रहायला. त्यावर विठ्ठलराव म्हणाले,‘‘ठीक आहे. जाऊ द्या त्यांना दक्षिणेत! मी पाहतो कोणीतरी! पुढे उमेदवार म्हणून बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव पुढे आले.

खासदारकीबाबत काय वाटत होते, हे त्यांनी या आत्मचरित्रात लिहिले. ते म्हणतात, ‘‘ आपण तर मॅट्रिक झालेलो. पण, नकार देण्याचा मला अधिकार नव्हता. नाव पक्के झाल्यावर मी ही हे विचार डोक्यातून काढून टाकले आणि आता उभे राहिलो ना! पाहू जे व्हायचे ते होईल. मग मला कि. बा. म्हस्के, आठरे पाटील, फलके गुरुजी, कानवडे पाटील यांनी पार्लमेंट कसे चालते, जात्यावर बसलं की ओव्या सुचतात! तुम्ही चांगलं काम कराल, असं मानसिक बळ दिलं आणि पुढे निवडून आलो.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com