Navneet Rana: रवी राणा यांचं भाषण सुरु असताना नवनीत राणा का रडल्या?

Amravati Lok Sabha 2024: नवनीत राणा आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी आयोजित सभेत रवी राणा बोलत असताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.
Navneet Rana
Navneet Ranaesakal

Amravati Lok Sabha 2024

नवनीत राणा आज अमरावती मतदार संघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या सभेला उपस्थित होते. यावेळी रवी राणा यांनी भाषणात आमदार बच्चू कडू यांच्या ताशेरे ओढले. आमचा एक मित्र फडणवीस आणि शिंदेंचा उपयोग करुन घेतात, असे राणा म्हणाले.

रवी राणा यांचं भाषण ऐकूण नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. ही विजय रॅली आहे. यावळी रवी राणा आमदार बच्चू कडू यांच्यावर प्रहार करत होते. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे अमरावतीत महायुती, महाविकास आघाडी आणि प्रहार अशी तिरंगी लढत होणार आहे.

आमचे मित्र (बच्चू कडू) सरकार आल्यानंतर पूर्ण उपयोग घेतात. ते मित्र रवी राणा, नवनीत राणा यांचा बाप काढतात. मी त्यांना सांगतो माझा हमाल होता. नवनीत राणा यांचा बाप सैनिक होता. मी चांगल्या कामात साथ दिली नाही तर मी राजकारणात राहणार नाही, असे रवी राणा म्हणाले.

Navneet Rana
Navneet Rana: नवनीत राणांची उमेदवारी धोक्यात?, सुप्रीम कोर्ट जात वैधता प्रमाणपत्रावर देणार निकाल

रवी राणा म्हणाले,  आमचे भाऊ मंत्री असताना शेतकरी त्रस्त होता. आमच्या जिल्ह्यातील दोन मंत्री होते. तरी देखील एकपण प्रकल्पपूर्ण झाला नाही. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले तर मला तुरुंगात टाकण्यात आलं. मला पाणी आणि सतरंजी देखील दिली नाही.

Navneet Rana
Jalgaon Lok Sabha Constituency : उन्मेश पाटलांच्या ‘उबाठा’तील प्रवेशाने जिल्ह्यात समीकरणे बदलणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com