Arvind Kejriwal: काँग्रेससोबत पर्मनंट लग्न झालेलं नाही! केजरीवालांचा नवा बॉम्ब

केजरीवाल यांच्या या ताज्या विधानानं पुन्हा राजकीय खळबळ माजली आहे.
Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Rahul Gandhi and Arvind Kejriwalsakal

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या काँग्रेसबाबतच्या ताज्या विधानानं पुन्हा राजकीय खळबळ माजली आहे. काँग्रेससोबतची आघाडी ही काही कायमची आघाडी नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला हारवण्यासाठी आम्ही दिल्लीत एकत्र आलो आहोत, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Sanjay Raut: CM शिंदेंनी पाठवली संजय राऊतांना कायदेशीर नोटीस; राऊत म्हणतात, इंटरेस्टिंग...

इंडिया टुडेशी बोलताना केजरीवाल म्हणाले, ४ जूनची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. कारण इंडिया आघाडीचा लोकसभा निवडणुकीत मोठा विजय होणार आहे. आपचं काँग्रेससोबत पर्मनन्ट लग्न झालेलं नाही. आमचं ध्येय हे भाजपला पराभूत करणं आणि हुकुमशाही संपवणं त्याचबरोबर सध्याच्या सरकारमध्ये वाढलेली गुंडागर्दी संपवणं हे आहे.

Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Pune Porsche Crash : पोलिसांकडून 'ससून'मधील महत्त्वाची कागदपत्रं जप्त; पोलिसांच्या जीवावर डॉ. तावरे करायच्या पार्ट्या

दरम्यान, सध्या आप आणि काँग्रेसची दिल्लीत युती आहे. पण शेजारच्याच पंजाब राज्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. यापार्श्वभूमीवर केजरीवाल म्हणाले, देश वाचवणं हे सध्याच्या घडीला महत्वाचं आहे. त्यामुळं भाजपला रोखण्यासाठी जिथं गरजेचं आहे तिथं आप आणि काँग्रेस एकत्र आलेले आहेत. पण पंजाबमध्ये भाजपचं अस्तित्व नाही, त्यामुळं इथं आम्हाला एकत्र येण्याची गरज नव्हती.

Rahul Gandhi and Arvind Kejriwal
Pune Porsche Car Crash: "मला मारु नका, हवे तेवढे पैसे देतो..."; दोघांना कारनं उडवल्यानंतरही बिल्डरपुत्राचा तोरा होता कायम

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा आपण राजीनामा देणार नाही, असंही पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्ली दारु घोटाळ्यात माझं पुन्हा तुरुंगात जाणं हा मुद्दा नाहीए तर देशाचं भविष्यचं सध्या धोक्यात आहे. त्यांना मला किती काळासाठी तुरुंगात पाठवायचं आहे पाठवू द्या पण फक्त भाजपला वाटतंय म्हणून मी माघार घेणार नाही, असंही केजरीवालांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com