Babanrao Gholap : बबनराव घोलप यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

शिर्डी या राखीव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यास इच्छुक असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे नेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.
Babanrao Gholap
Babanrao Gholapsakal

मुंबई : शिर्डी या राखीव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यास इच्छुक असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे नेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच घोलप यांनी ठाकरे यांच्या पक्षाला हा धक्का मानला जात आहे. बबनराव घोलप हे नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदार संघातून तब्बल पाच वेळा विधानसभेवर निवडून आले होते.

Babanrao Gholap
Loksabha Election 2024 : भाजपला खात्री, तर कॉँग्रेसला बदलाची आशा ; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख नेत्यांच्या होणार सभा

समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. मागील अनेक वर्षांपासून घोलप सत्तेच्या राजकारणापासून दूर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना शिर्डी राखीव मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते, अशी चर्चा आहे. पण त्यांना या उमेदवारीपासून डावलण्यात आल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने माझ्यावर अन्याय केला. मला अहमदनगर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदावरून काढून टाकले. उमेदवारीचा शब्द दिला असताना तो पाळला नाही, अशी खंत घोलप यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com