Balasaheb Thorat : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व गोड होईल ; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना आशा,सांगलीसाठी ठामच

सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व काही गोड होईल, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsakal

मुंबई : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्व काही गोड होईल, अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत काँग्रेसला इशारा दिल्यानंतरही काँग्रेस नेत्यांनी अद्याप माघार घेतली नाही. आम्ही अजूनही सांगलीच्या जागेसाठी ठाम असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर या संदर्भातील निर्णय हा दिल्लीतील वरिष्ठ नेते घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
Loksabha Election 2024 : दशकांनंतर नक्षलग्रस्त भागातील नागरिक प्रथमच करणार मतदान

सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी आग्रही भूमिका घेतली असून ही जागा काँग्रेसला न मिळाल्याचा निषेध म्हणून त्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकांवर बहिष्कार घातला आहे. त्यासाठी त्यांनी दिल्ली येथे जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेटही घेतली आहे. त्याच संदर्भात त्यांनी आज काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.

त्यानंतर थोरात यांनी राज्यातील जागांबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. राज्यातील सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एका लोकसभा मतदारसंघांबाबत काँग्रेस अजूनही आग्रही असून याबाबत पक्षाच्या वतीने दिल्लीतील वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

Balasaheb Thorat
Loksabha Election 2024 : गड, किल्ले, पर्यावरण संवर्धन, विकास ठरतोय प्रचाराचा मुद्दा

सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी पक्षाची इच्छा आहे. या संदर्भात थोरात म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली असल्याचे थोरात यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com