Beed Loksabha 2024 : पंकजांच्या पराभवानंतर 'या' पाच जणांची आमदारकी धोक्यात; निकालाच्या आकड्यांमुळे चिंता वाढली

खरंतर बीड लोकसभेचा निकाल हा मतमोजणीच्या ३३ फेऱ्यानंतर लागला आहे. त्यात सुरुवातीलाच सोनवणेंनी आघाडी घेतली होती. पहिल्या सात फेऱ्यांमध्ये ते आघाडीवर होते. त्यानंतर ८ ते ११ व्या फेरीपर्यंत पंकजा मुंडेंनी आघाडी घेतली. त्यानंतर १२ आणि १३ व्या फेरीत पुन्हा बजरंग सोनवणे यांनी आघाडी मिळवली. त्यानंतर १५ ते २७ फेरीपर्यंत पंकजा आघाडीवर होत्या. २८ व्या फेरीपासून ३३ व्या फेरीपर्यंत बजरंग सोनावणेंनी आघाडी मिळवली अन् थेट त्याचं रुपांतर विजयात झालेलं दिसलं. अन् अवघ्या साडेसहा हजार मताधिक्यानं बजरंग सोनवणे जायंट किलर ठरले.
bajarang sonawane pankaja munde
bajarang sonawane pankaja mundeesakal

Beed Lok sabha election result 2024 pankaja munde bajarang sonawane : बीड लोकसभा मतदारसंघात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे जायंट किलर ठरलेत. त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव केला. पवारांच्या या पठ्ठ्यानं आपल्या लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या ५ आमदारांची हवा टाईट केली आहे. कारण गड्यानं महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघातूनही लीड घेतलीय. त्यामुळे निकाल बीड लोकसभेचा लागला असला तरी महायुतीच्या ५ आमदारांची येत्या विधानसभेला आमदारकी धोक्यात येणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

बीडची ओळख ही भाजपात अन् महायुतीत कायम मुंडेंचा बालेकिल्ला अशी राहिली आहे. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यानं गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडेंच्या ओटीत पराभव टाकला आहे. त्यामुळे मुंडेंना आपला बीडचा गड राखता आला नाही, अशी चर्चा आहे. तरी, बीड लोकसभेचा निकाल कसा रंजक होता? अन् बजरंग सोनावणेंनी पंकजाताईंना कशी टफ फाईट दिली, ते आपण फेरीनिहाय पाहिलं तर आपल्याला कळेल की, मराठवाड्यातली बीडची लढत यंदा एवढी चर्चेत का होती?

bajarang sonawane pankaja munde
UBT MP: 'उबाठा सेनेचे 2 खासदार शिंदेंच्या संपर्कात?' दिल्लीत नरेश म्हस्केंनी केला मोठा दावा

खरंतर बीड लोकसभेचा निकाल हा मतमोजणीच्या ३३ फेऱ्यानंतर लागला आहे. त्यात सुरुवातीलाच सोनवणेंनी आघाडी घेतली होती. पहिल्या सात फेऱ्यांमध्ये ते आघाडीवर होते. त्यानंतर ८ ते ११ व्या फेरीपर्यंत पंकजा मुंडेंनी आघाडी घेतली. त्यानंतर १२ आणि १३ व्या फेरीत पुन्हा बजरंग सोनवणे यांनी आघाडी मिळवली. त्यानंतर १५ ते २७ फेरीपर्यंत पंकजा आघाडीवर होत्या. २८ व्या फेरीपासून ३३ व्या फेरीपर्यंत बजरंग सोनावणेंनी आघाडी मिळवली अन् थेट त्याचं रुपांतर विजयात झालेलं दिसलं. अन् अवघ्या साडेसहा हजार मताधिक्यानं बजरंग सोनवणे जायंट किलर ठरले.

बीडमध्ये पंकजा मुंडे ह्या भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचा पराभव झाल्याने जिल्ह्यातील महायुतीच्या पाचही आमदारांचं टेन्शन वाढलेलं दिसतंय. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर २०१४ मध्ये ६ पैकी भाजपचे ५ आमदार विजयी झाले होते. मात्र २०१९मध्ये चित्र बदललं. ६ पैकी केवळ २ मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहिलं, तर तेव्हा राष्ट्रवादीच्या ४ आमदारांनी इथे बाजी मारली. पण राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर संदीप क्षीरसागर वगळता इतर तीनही आमदार अजित पवारांसोबत गेले जे आता महायुतीचा भाग आहेत.

bajarang sonawane pankaja munde
Ind Vs Pak Playing-11 : कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय; पाकिस्तानविरुद्ध 'या' प्लेइंग इलेव्हनसह उतरणार मैदानात

कुठे आघाडी, कुठे पिछाडी?

  • धनंजय मुंडेंच्या परळीत पंकजा मुंडेंना ७४ हजार मतांनी आघाडी मिळाली असली तरी गेल्या वेळच्या तुलनेत कमालीनं घटली आहे.

  • अजित पवार गटाच्या प्रकाश सोळंके यांच्या माजलगावमध्ये पंकजांनी अवघी ९३५ मतांची आघाडी मिळाली.

  • भाजपच्या लक्ष्मण पवारांच्या गेवराईत पंकजा मुंडेंना तब्बल ३९ हजार मतांची पिछाडी आहे

  • भाजपच्या नमिता मुंदडा यांच्या केजमध्ये १३ हजार मतांनी पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत

  • अजित पवार गटाच्या बाळासाहेब आजबेंच्या आष्टीत तब्बल ३२ हजार मतांची आघाडी मिळाली असली तरी ती गेल्यावेळच्या तुलनेत कमी होती.

महायुतीच्या पाचही आमदारांचं टेंशन वाढलंय

दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बजरंग सोनवणेंना बीड विधानसभा मतदारसंघातून तब्बल ६१ हजार मतांची आघाडी दिली. त्यामुळे त्यांचं वजन महाविकासआघाडीत वाढलंय. मात्र महायुतीच्या इतर पाचही आमदारांना विधानसभेसाठी आतापासूनच खबरदारी घ्यावी लागणार आहे. अन्यथा लोकसभेचा फटका विधानसभेतही बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पाचही आमदारांना आतापासूनच काम करावं लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com