Anoop Dhotre : अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे विजयी

सलग पाचव्यांदा गड कायम राखण्यात भाजपाला यश
Anoop Dhotre : अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे विजयी
Anoop Dhotreesakal

अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ०६- अकोला मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनूप संजय धोत्रे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी अज‍ित कुंभार यांनी हा निकाल जाह‍ीर केला. विजयी उमेदवार अनुप धोत्रे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मतमोजणी निरीक्षक रामप्रतापसिंह जाडोन व प्रतुलचंद्र सिन्‍हा उपस्थित होते.

Anoop Dhotre : अकोला मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे विजयी
Nashik Crime News : माजी नगरसेवक ॲड. सुनील बोराडे यांच्यावर विहीतगाव येथे जहल्ला! तिघा संशयितांना अटक

जाहिर झालेल्या निकालात पुढीलप्रमाणे उमेदवारांना मतदान झाले. अनूप धोत्रे (भारतीय जनता पार्टी) एकूण मते ४ लाख ५७ हजार ३० , अभय पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) ४ लाख १६ हजार ४०४ एकूण मते, काशिनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी) २ हजार ७६० एकूण मते, रव‍िकांत रामकृष्ण अढाऊ (जय विदर्भ पार्टी) १ हजार ७३४ एकूण मते, प्रकाश आंबेडकर (वंच‍ित बहुजन आघाडी) २ लाख ७६ हजार ७४७ एकूण मते, ॲङ नजीब शेख (इंडियन नॅशलन लिग) ३ हजार ३०० एकूण मते, प्रिती प्रमोद सदांशिव (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया) ५३६ एकूण मते, बबन सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी) ५३७ एकूण मते, मो. एजाज मो. ताहेर (आझाद अधिकार सेना) ५६८ एकूण मते, अशोक थोरात (अपक्ष) ५८१ एकूण मते, आचार्यद‍िप गणोजे (अपक्ष) १ हजार ६१८ एकूण मते, उज्वला राऊत (अपक्ष) १ हजार ३०६ एकूण मते, द‍िलीप म्हैसने (अपक्ष) ८६२ एकूण मते, धमेंद्र कोठारी (अपक्ष) १ हजार २४० एकूण मते, मुरलीधर पवार (अपक्ष) २ हजार ६६ एकूण मते, एकूण नोटा (५ हजार ७८३).

या मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. २६ एप्रिल रोजी मतदान झाले. मतमोजणी महाराष्‍ट्र वखार महामंडळ येथे सकाळी ८ पासून सुरू झाली. मतमोजणीच्या एकूण २८ फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला. मतमोजणीसाठी सामान्य निरीक्षक म्हणून अकोट, बाळापूर व अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार क्षेत्राकरिता रामप्रतापसिंह जाडोन तसेच अकोला (पूर्व), मुर्तिजापूर (अ.जा.) व रिसोड विधानसभा मतदार क्षेत्राकरिता प्रतुलचंद्र सिन्‍हा यांनी काम पाहिले. मतमोजणीचे अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार टपाली मतपत्रिकांची मतमोजणी १६ टेबलवर व ईव्हीएम वरील मतांची मोजणी विधानसभा मतदार क्षेत्रनिहाय प्रत्‍येकी १४ टेबल वर करण्‍यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com