Modi Ka Pariwar Song Launch: भाजपकडून 'मोदी का परिवार' गाणं लॉन्च! स्वतः पंतप्रधानांनीचं केलं शेअर

आजच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानतंर लगेचच भाजपच्या प्रचाराला वेग आला आहे.
Modi Ka Pariwar Song Launch
Modi Ka Pariwar Song Launch

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज लोकसभा निवडणूक जाहीर केली. त्याचबरोबर आजच आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली. यानंतर काही तासांतच भाजपचं प्रचार गीत लॉन्च झालं आहे. 'मोदी का परिवार' हे प्रचार गीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केल आहे. (BJP Launch Modi Ka Pariwar Song PM Modi himself shared it on his social media)

गाण्यात काय आहे?

मोदी का परिवार हूं....असे गाण्याचे बोल असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं यातून कौतुक करण्यात आलं आहे. देशातील प्रत्येक राज्यातील नागरिकाचं प्रतिबिंब या गाण्यात दिसून येतं. यामध्ये जम्मू आणि काश्मीरपासून तामिळनाडू ते महाराष्ट्र पासून ईशान्य भारतातील नागरिक यामध्ये आम्ही मोदींचा परिवार आहोत असं सांगताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

Modi Ka Pariwar Song Launch
Lok Sabha Election 2024: देशातील 543 जागांवर कधी होणार निवडणूक? जाणून घ्या प्रत्येक मतदारसंघाची सविस्तर माहिती

यामध्ये प्रांतिक, भाषिक, शेतकरी, कामगार-मजूर, कॉर्पोरेट असा सर्वच क्षेत्रातील लोक यामध्ये 'मोदी का परिवार हूं' असं म्हणताना दाखवले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारनं ज्या योजना आणल्या त्या योजनांचा फायदा लोकांना होत असल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलं असून जे या योजनांचे लाभार्थी आहेत ते देखील आपण मोदींचा परिवार आहोत असं यात म्हणताना दाखवले आहेत. (Marathi Tajya Batmya)

Modi Ka Pariwar Song Launch
Loksabha Election 2024: देशात 543 ऐवजी 544 मतदरासंघात होणार निवडणूक; एक अतिरिक्त मतदारसंघ का? जाणून घ्या

त्याचबरोबर राम मंदिराची उभारणी करणाऱ्या कामगारांवर मोदींनी उधळलेली फुलं, चांद्रयान २ अपयशी ठरलं होतं तेव्हा इस्रो प्रमुख के. सिवन यांना सावरताना, शाळेतील मुलांसाठी परीक्षा पे चर्चा आदी मोदींनी राबवलेल्या कार्यक्रमांची झलकीह या व्हिडिओमध्ये दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com