Madha Lok Sabha : रणजितसिंहांना निवडून आणण्यासाठी करावं लागणार जिवाचं रान; आमदार गोरेंची प्रतिष्ठा पणाला..

आमदार गोरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण, रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळवून देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
Jaykumar Gore
Jaykumar Goreesakal
Summary

रणजितसिंह यांचा विजय हा आमदार गोरेंची विधानसभा निवडणूक सोपी करणारा असेल. मात्र, लोकसभेतील पराभव हा जयकुमार गोरेंसाठी विधानसभेच्या वाटेत मोठा अडथळा ठरू शकतो.

Madha Lok Sabha : विविध डावपेचांमुळे गाजत असलेला, अतिशय प्रतिष्ठेचा बनलेला, चुरशीच्या लढतीचा मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात गाजत आहे. मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी महायुतीतून भाजप, तर आपल्याकडे खेचून आणण्यासाठी महाविकासमधून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याच माढ्यातील माण विधानसभा मतदारसंघ (Man Assembly Constituency) या निवडणुकीत पहिल्यापासूनच महत्त्वपूर्ण ठरला आहे. माण मतदारसंघातील नेते लोकसभेचे निमित्त करून विधानसभेवर डोळा ठेऊन आहे. त्यादृष्टीनेच हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे.

Jaykumar Gore
Sangli Lok Sabha : कारखाना चालवता येईना अन् निघालाय खासदार व्हायला; अजितदादांनी विशाल पाटलांना हाणला टोला

मतदारसंघांची फेररचना अस्तित्वात येण्यापूर्वी माण मतदारसंघावर माजी आमदार (कै.) सदाशिवराव पोळ यांची एकहाती सत्ता होती, तर खटाव मतदारसंघाचे नेतृत्व (कै.) भाऊसाहेब गुदगे व त्यानंतर माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले. मात्र, मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या माण विधानसभा मतदारसंघाच्या २००९ मध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीत नवख्या जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी अपक्ष लढताना मातब्बर सदाशिवराव पोळ व डॉ. येळगावकर यांना धूळ चारली. त्यानंतर २०१४, २०१९ या सलग तीन निवडणुकींमध्ये काँग्रेस व भाजपकडून लढून विजय मिळवला.

या सर्व पार्श्वभूमीवर माणमध्ये काय घडणार? येथील मतदार कोणाला कौल देणार? याबाबत खलबते सुरू झाली आहेत. माण मतदारसंघात आमदार गोरे यांच्यासोबत माजी आमदार डॉ. येळगावकर, डॉ. संदीप पोळ यांच्यावर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचाराची धुरा आहे, तर धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे संपर्कप्रमुख शेखर गोरे, काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख आदी नेते मैदानात उतरले आहेत.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात गेलेले माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, नंदकुमार मोरे यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीच्या अभयसिंह जगताप यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, तर रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Jaykumar Gore
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : नारायण राणेंना महायुतीची उमेदवारी म्हणजे मला देवच पावला; असं का म्हणाले राऊत?

महत्त्वाचे म्हणजे, आमदार गोरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. कारण, रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळवून देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे व गोळाबेरीज करण्याचे नियोजनही तेच करत आहेत. त्यामुळे रणजितसिंह यांना निवडून आणताना माणमधून मतांची भरभक्कम आघाडी देणे, त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे. रणजितसिंह यांचा विजय हा आमदार गोरेंची विधानसभा निवडणूक सोपी करणारा असेल. मात्र, लोकसभेतील पराभव हा जयकुमार गोरेंसाठी विधानसभेच्या वाटेत मोठा अडथळा ठरू शकतो.

दुसरीकडे, मोहिते-पाटील यांच्या निवडणुकीच्या आडून प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, शेखर गोरे, रणजितसिंह देशमुख आदी मातब्बर आपला विधानसभेचा खुट्टा बळकट करण्याची तयारी करत आहेत. अभयसिंह जगताप हे सुद्धा महाविकास आघाडीच्या प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. यातूनही जर मोहिते-पाटील यांचा पराभव झालाच, तर तो त्यांच्यासाठी मोठा धक्का असेल. मात्र, मोहिते-पाटील यांचा विजय हा यांच्या आशाआकांक्षांना बळ देणारा ठरेल. मात्र, विजयासोबत मिळणारे मताधिक्य सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

Jaykumar Gore
Uday Samant : 'अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागं घेतलं, पण भविष्यात किरण सामंत खासदार होणार'

सध्या महाविकास आघाडी एकसंधपणे आघाडी धर्म पाळेल, असे चित्र आहे. मात्र, महायुतीत सर्व आलबेल आहे, असे दिसत नाही. त्यामुळे महायुतीतील सर्वच नेते युती धर्म पाळतील, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. रासप, स्वाभिमानी व वंचितच्या मतांचा फटका कोणाला बसणार, हे पाहावे लागणार आहे.

मोहिते-पाटलांचे ऋणानुबंध..

मोहिते-पाटील यांचे माण मतदारसंघातील जनतेशी तीन पिढ्यांचे संबंध आहेत आणि त्यांनी ते प्रयत्नपूर्वक जपले व जोपासले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात त्यांना मानणारा सर्वपक्षीय गट तयार करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. याबाबतीत ते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यापेक्षा सरस ठरतात.

Jaykumar Gore
Kolhapur Lok Sabha : 'नथुराम गोडसेच्या विचाराने चाललेल्या भाजप सरकारला उलटवून टाका'; शाहू महाराजांच्या प्रचारार्थ मेळावा

आमदार गोरेंपुढे आव्हान

माढा लोकसभा मतदारसंघात किंगमेकर बनलेले आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी सध्या आव्हानात्मक परिस्थिती तयार झाली आहे. अनपेक्षित घडामोडींमुळे रणजितसिंह यांना निवडून आणण्यासाठी त्यांना जिवाचे रान करावे लागेल. माणमधील बहुतांशी विरोधक एकवटल्याने माणमध्ये मागील लोकसभेवेळी रणजितसिंह यांना दिलेले साधारण २३ हजारांचे मताधिक्य टिकविणे, अथवा त्यात वाढ करणे, सोपे राहिलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com