Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

कुस्तीपटू महिलांनी केलेले लैंगिक शोषणाचे आरोप आणि आंदोलनामुळं ब्रिजभूषण सिंह हे चर्चेत आले होते.
Brijbhushan Singh
Brijbhushan SinghEsakal

नवी दिल्ली : ऑलिम्पिकवीर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाच्या केलेल्या गंभीर आरोपांनंतर आणि आंदोलनानंतर भारतीय कुस्तीमहासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांना लोकसभेला पुन्हा तिकीट मिळणार का? अशी चर्चा सुरु होती.

पण आता भाजपनं ब्रिजभूषण सिंहबाबत अखेर फैसला केला आहे. कैसरगंज या त्यांच्या मतदारसंघातून भाजपनं ब्रिजभूषण सिंह यांचं तिकीट कापत त्यांच्या मुलाला उमेदवारी देऊ केली आहे. (BJP nominates Karan Bhushan Singh who is son of Brij Bhushan Singh from Kaiserganj in Uttar Pradesh)

भाजपनं उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह आणि कैसरगंज इथून करण भूषण सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. करण भूषण सिंह हे ब्रिजभूषण सिंह यांचे पुत्र आहेत. करण भूषण सिंह हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

Brijbhushan Singh
Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

कैसरगंज लोकसभा मतदारसंघावर ब्रिजभूषण सिंहची मजबूत पकड आहे. ब्रिजभूषण सिंहनी स्वतः लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण गेल्या वर्षभरापासून ब्रिजभूषण सिंह वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानं त्याऐवजी भाजप त्याच्या कुटुंबातील व्यक्तीलाच तिकीट देईल अशी शक्यता वर्तवली जात होती, या शक्यतेवर अखेर आज शिक्कामोर्तब झालं. (Latest Marathi News)

Brijbhushan Singh
Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

कैसरगंज जागेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ मे आहे. या जागेवर पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात मोहनलालगंज, लखनऊ, रायबरेली, अमेठी, जालौन, झांशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज आणि गोंडा या मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com