Vijender Singh : ऑलिंपिक पदक विजेत्या बॉक्सरचा कॉंग्रेसला रामराम, विनोद तावडेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
Boxer Vijender Singh quits Congress joins BJP Lok Sabha Election 2024 News Marathi
Boxer Vijender Singh quits Congress joins BJP Lok Sabha Election 2024 News Marathi sakal

Boxer Vijender Singh joins BJP : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. बॉक्सिंगमधील भारताचे पहिले ऑलिम्पिक मेडल विजेता विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांनी त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुख्यालयात त्यांचा पक्षात समावेश केला आहे.

यावेळी विजेंदर सिंग म्हणाले की, 'सर्वांना राम राम. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करत आहे. एक प्रकारे हे घरवापसी आहे.

Boxer Vijender Singh quits Congress joins BJP Lok Sabha Election 2024 News Marathi
T20 World Cup 2024 : IPL मधून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात होणार एंट्री... वर्ल्ड कपमध्ये सिराजचा पत्ता कट?

विजेंदर सिंग यांची राजकीय कारकीर्द फारच लहान आहे. विजेंदर सिंग यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक दक्षिण दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली होती, पण तेथे त्यांचा पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे नाव मथुरा येथून पक्षाचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, जिथून अभिनेत्री आणि विद्यमान खासदार हेमा मालिनी पुन्हा निवडणूक लढवत आहेत..

Boxer Vijender Singh quits Congress joins BJP Lok Sabha Election 2024 News Marathi
IPL 2024: दोन विजयांनंतर लखनऊला तगडा झटका! 6 कोटींचा खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर, Video शेअर करत दिली माहिती

विजेंदर सिंग हा भारतातील हरियाणा येथील जाट समाजातून येतो. त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1985 रोजी हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील कालुवास नावाच्या गावात झाला. त्याचे वडील महिपाल सिंग बेनिवाल हे हरियाणा रोडवेजमध्ये बस ड्रायव्हर आहेत आणि आई कृष्णा देवी गृहिणी आहेत. विजेंदरचा मोठा भाऊ मनोज हा देखील बॉक्सर आहे. विजेंदरने आपले प्राथमिक शिक्षण कालुवास येथील शाळेतून पूर्ण केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com