Chief Election Commission_Rajeev Kumar
Chief Election Commission_Rajeev Kumar

EVM Allegations: अधुरी हसरते...! मुख्य निवडणूक आयुक्तांनी उलगडून सांगितलं EVM मशीनचं गणित

ईव्हीएम मशिनबाबत विविध माध्यमातून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात यावर राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नवी दिल्ली : ईव्हीएम मशिनबाबत विविध माध्यमातून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. आजही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असताना यामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावर प्रश्न उपस्थित केला. यावर राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हा प्रश्न येऊ शकतो हे लक्षात घेत त्यांनी त्यावर एक शेरही लिहिला आणि तो पत्रकार परिषदेत सादर केला. "अधुरी हसरतो का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नही, वफा खुद से नही होती खता ईव्हीएम की करते हो" (Chief Election Commissioner Rajeev Kumar explained mathematics of the EVM machine)

Chief Election Commission_Rajeev Kumar
Lok Sabha Election 2024 Dates: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 'या' तारखेला लागणार निकाल...7 टप्प्यात होणार मतदान!

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "ईव्हीएमबाबत मी अनेकदा सांगितलं आहे. पण परत एकदा प्रश्न विचारला आहे तर मी पुन्हा सांगतो. सध्या याविरोधात अभियान देखील सुरु आहे सोशल मीडियावर तर मी सांगूनच टाकतो. देशातील संविधानिक कोर्टांनी अर्थात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टांनी ईव्हीएमवरील तक्रारींवर ४० वेळा भाष्य केलं आहे. Election Briefs

Chief Election Commission_Rajeev Kumar
Election Commission of India Press Conference Live: केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

ईव्हीएमच्या तक्रारी काय आहेत?

हे हॅक करता येतात, याची चोरी होऊ शकते, १९ लाख मशिन हरवल्या आहेत, यामध्ये मतदान दिसत नाही, कॉम्प्युटरनं ही खराब होऊ शकते, निकाल बदलू शकतो, यात छेडछाड होऊ शकते, अशा प्रकारच्या तक्रारी ईव्हीएमविरोधात आल्या आहेत. यामध्ये कोर्टानंही निकाल देताना या सगळ्या तक्रारी खोडून काढल्या आहेत. (Latest Maharashtra News)

कोर्टानं म्हटलंय की, या मशिनला व्हायरस लागूच शकत नाही, यामध्ये मतं बाद होऊच शकत नाहीत, छेडछाड होऊ शकत नाही, ईव्हीएम हे फुलप्रुफ डिव्हाईस आहे, आम्हाला कोर्टानं एका ऐवजी पाच व्हीव्हीपॅट मोजायला सांगितले ते आम्ही केले. आता परत तक्रारी यायला लागल्या तर दिल्ली हायकोर्टानं तक्रारदारावर दंड लावायला सुरुवात केली आहे. नुकतेच सुप्रीम कोर्टानंही अशाच एका याचिकेवर निकाल दिला आहे. (Marathi Tajya Batmya)

Chief Election Commission_Rajeev Kumar
Assembly Elections 2024 : लोकसभेसोबतच 'या' चार राज्यात होणार विधानसभेच्या निवडणुका! निवडणूक आयोगाची घोषणा

निवडणूक आयोगाकडं तक्रारी करा

तुम्हाला काही तक्रारी असतील तर आम्हाला विचारा. कोणी पण येतंय आणि ईव्हीएमचा मुद्दा सोशल मीडियावर घेऊन बसतं. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची तर आता डिग्री पण तपासायला पाहिजे. जेव्हा पण तुम्ही आम्हाला ईव्हीएमबाबत प्रश्न विचाराल तर तो प्रश्न आम्ही एफएक्यू (FAQ) मध्ये टाकू, यामध्ये सध्या १०० पेक्षा अधिक प्रश्न आहेत, असंही यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. Education about Elections

Chief Election Commission_Rajeev Kumar
WPL 2024 Final : दिल्लीला आरसीबी देणार कडवं आव्हान, विजेत्यानां रणजीपेक्षाही मिळणार मोठी बक्षीस रक्कम

किती वेळा ईव्हीएमनं सत्ताधाऱ्यांना हरवलं?

ईव्हीएम संदर्भात यामध्ये जेवढी कायदेशीर प्रकरणं झालीत या ४० प्रकरणांवर आधारित आम्ही एक पुस्तक तयार केलं आहे. यामध्ये एफएक्यूज आहेत. आमच्या वेबसाईटवरही आहे हे पुस्तक. यामध्ये चार्ट देखील आहे. यात किती वेळा सत्तेत असलेल्या पक्षाला ईव्हीएमनं बदलून टाकलं आहे, याचा उल्लेखही आहे. मला वाटलंच होतं काल रात्री की यावर एकतरी प्रश्न येईल. त्यामुळं मी रात्री एक ओळ लिहिली, ती वाचून दाखवतो. (Latest Marathi News)

"अधुरी हसरतो का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नही! वफा खुद से नही होती खता ईव्हीएम की कहते हो" पण जेव्हा निकाल येतात तेव्हा मात्र तुम्ही आपल्या आरोपांवर ठाम राहत नाहीत, कारण निकाल तुमच्या बाजूनं लागलेला असतो. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो की, ईव्हीएम हे पूर्णपणे सुरक्षित आहे. यात वेळोवेळी आम्ही अनेक नव्या सुधारणा केल्या आहेत. आता तर प्रत्येक ईव्हीएमचा नंबर तो ज्या बुथवर जाईल तो उमेदवाराला दिला जाईल, अशी सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com