Chikkodi Lok Sabha : चिक्कोडी मतदारसंघातून 1 लाखाहून अधिक मतांच्या फरकाने विजयी होणार; पालकमंत्र्यांच्या मुलीला विश्वास

चिक्कोडीतील जनतेने मला आशीर्वाद दिल्यास मी चिक्कोडीत माझे घर व कार्यालय करून येथील लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहीन.
Congress candidate Priyanka Satish Jarkiholi
Congress candidate Priyanka Satish Jarkiholiesakal
Summary

मी ही निवडणूक जिंकल्यास देशात सर्वात कमी वयाच्या तरुण वयात खासदार होण्याचा मान मिळणार आहे.

चिक्कोडी : चिक्कोडी लोकसभा (Chikkodi Lok Sabha) मतदारसंघातील आठही विधानसभा मतदारसंघात जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. या मतदारसंघात काँग्रेसची (Congress) लाट असून, येत्या निवडणुकीत १ लाखाहून अधिक मतांच्या फरकाने विजयी होणार असल्याचा विश्वास काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका सतीश जारकीहोळी (Priyanka Satish Jarkiholi) यांनी केला.

Congress candidate Priyanka Satish Jarkiholi
Satara Lok Sabha : '..तसं नाही केलं तर पवारांची औलाद सांगणार नाही'; कोणाला उद्देशून म्हणाले अजितदादा?

येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रियंका जारकीहोळी म्हणाल्या, चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची लाट आहे. प्रचार सभेतही मोठ्या संख्येने लोक सामील होत आहेत. विकासासाठी लोकांनी मतदानरूपी आशीर्वाद द्यावा. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात सर्वत्र प्रचार केला आहे. प्रचार सभांमध्ये लोकांनी पाणी योजना आणि तरुणांना रोजगार देण्याच्या मागण्या मांडल्या आहेत. जनतेने आशीर्वाद दिल्यास या भागातील सिंचन प्रकल्पांना प्रामाणिकपणे प्राधान्य देऊन तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

जारकीहोळी पुढे म्हणाल्या, चिक्कोडीतील जनतेने मला आशीर्वाद दिल्यास मी चिक्कोडीत माझे घर व कार्यालय करून येथील लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहीन. मी औद्योगिक पार्क स्थापन करून सॉफ्टवेअर कंपन्या, आंतरराष्ट्रीय कंपन्या या भागात येऊन येथील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याशिवाय आयएएस, केएएससह स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्रे चिक्कोडीत सुरू करण्याचे नियोजन आहे. राज्यात काँग्रेस पक्ष किती जागा जिंकेल, या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, राज्यातील २८ लोकसभा मतदारसंघात माझ्यासह काँग्रेसचे १५ ते १८ उमेदवार विजयी होतील.

Congress candidate Priyanka Satish Jarkiholi
तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

चिक्कोडी, गोकाक जिल्हा घोषणेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, मी वडील मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करणार आहे. बिहारमधील लोक चिक्कोडी मतदारसंघात कार्ड वाटप करत असल्याची तक्रार असून त्याबाबत विरोधी पक्ष तुमच्या पक्षावर आरोप करत आहे. याबाबत मला माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या, आम्ही विकासाचे राजकारण करणार आहे.

Congress candidate Priyanka Satish Jarkiholi
Aditya Thackeray : 'भाजपला संविधान बदलायचंय, डॉ. आंबेडकरांनी दिलेली आरक्षणे काढून घेण्याचा त्यांचा डाव आहे'

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हुक्केरी येथील प्रचार सभेत जारकीहोळी कुटुंबावर केलेल्या आरोपाला आरोपाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, आमच्या कुटुंबात कोणी खाण व्यवसायात नाही. केंद्रीय मंत्री जनतेत चुकीचा संदेश देत आहेत. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ आमदार, नेते आणि कार्यकर्ते चिक्कोडी मतदारसंघातून काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. या भागातील सर्वांनी ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतदान करून आशीर्वाद द्यावेत. मी ही निवडणूक जिंकल्यास देशात सर्वात कमी वयाच्या तरुण वयात खासदार होण्याचा मान मिळणार आहे. हे वैभव चिक्कोडीवासीयांच्या हाती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com