Election Commission
Election Commissionsakal

Election Commission : निवडणूक ड्युटी टाळणाऱ्यांवर आयोगाचे कारवाईचे संकेत

रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन जोरदार तयारी करीत आहे. यात निवडणूक कर्मचाऱ्यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे.

अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन जोरदार तयारी करीत आहे. यात निवडणूक कर्मचाऱ्यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. मात्र अनेक कर्मचाऱ्यांना हे काम किचकट, कटकटीचे वाटते त्यामुळेच जिल्ह्यातील ३२३ कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्मचारी म्हणून काम करण्यास नकार दिला आहे.

निवडणूक कर्मचारी म्हणून काम करण्यास असमर्थ असल्याचे दाखवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी बनावट लग्न पत्रिकेसारखी कागदपत्रे जोडल्याने त्यांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. रायगड लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी शासकीय कर्मचारी, शिक्षक, अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.

Election Commission
Nitin Gadkari Interview : माझा आत्मा खुर्चीत अडकलेला नाहीये, पाहा नितीन गडकरींची दिलखुलास मुलाखत

नियुक्ती रद्दची कारणे

  • लग्न असल्याचे कारण यासाठी बनावट लग्नपत्रिका छपाई

  • आई-वडिलांचे आजारपण,

  • वाढते तापमान

  • वयोमानामुळे होणारी दगदग

  • शारीरिक व्याधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com