Satara Lok Sabha : साताऱ्यासाठी सिल्वर ओकवर खलबते; उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम, श्रीनिवास पाटलांचा पुन्हा लढण्यास नकार

सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत सध्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
Satara Lok Sabha
Satara Lok Sabha esakal
Updated on
Summary

महायुतीतून अद्याप खासदार उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

सातारा : लोकसभेच्या (Satara Lok Sabha) निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत साताऱ्याच्या उमेदवारीचा समावेश नसल्याने उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे. काल खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील यांनी सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली.

Satara Lok Sabha
Sangli Lok Sabha : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांच्या उमेदवारीनंतर नवा ट्विस्‍ट; बाबर-पाटील गटाच्या भूमिकांकडं लक्ष

आजही श्रीनिवास पाटलांनी (Shrinivas Patil) लढण्यास नकार दिला. त्यामुळे साताऱ्याच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत सध्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. महायुतीतून अद्याप खासदार उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीतही साताऱ्याचा समावेश नव्हता.

Satara Lok Sabha
मनमोहन सिंगांच्या दहा वर्षांच्या काळात काँग्रेसने 12 लाख कोटींचा भ्रष्टाचार केला; अमित शहांचा गंभीर आरोप

दिवसभर सातारा व माढा लोकसभेबाबत खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी खलबते सुरू होती. साताऱ्यातून खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. खासदार श्रीनिवास पाटील यांनीच रिंगणात उतरावे, म्हणून मनधरणी करण्यात आली; पण आजही श्रीनिवास पाटील यांनी लढण्यास नकार दिला. त्यामुळे शरद पवारांनी साताऱ्याचा विषय पेंडिंग ठेवला आहे. माढाबाबत येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर धैर्यशील मोहिते- पाटील यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Member of Parliament speaking during a Parliament session
Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde meetting
Chandrakant Patil latest statement on Sharad Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com