Arvind Kejriwal: EDचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र; केजरीवालांना जामीन का देऊ नये? दिली यादी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अबकारी कर घोटाळ्यात चौकशी सुरु असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalEsakal

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अबकारी कर घोटाळ्यात चौकशी सुरु असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सुप्रीम कोर्टानं नुकतीच केजरीवाल यांच्या याचिकेची दखल घेताना त्यांच्या अंतरिम जामिनावर विचार करु असं म्हटलं होतं. पण त्यासाठी ईडीला चौकशीचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले होते.

तसेच याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगानं ईडीनं आज नव्यानं प्रतिज्ञापत्र सादर केलं असून केजरीवाल यांना जामीन का देऊ नये हे मुद्दे मांडले आहेत. (ED in fresh affidavit in SC says Arvind Kejriwal not contesting LS polls and no political leader ever granted interim bail for campaigning)

ईडीनं आपल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय?

ईडीनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, कोणत्याही नेत्याला निवडणूक प्रचारासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही. कायद्यासमोर सर्व बरोबर आहेत तसेच निवडणूक प्रचार हा काही मुलभूत, संविधानिक किंवा कायदेशीर अधिकार नाही. तसेच केजरीवाल हे स्वतः उमेदवार नाहीत. त्यामुळं आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना जामीन देणं हा एक चुकीचा पायंडा पडेल. (Latest Marathi News)

Arvind Kejriwal
Dabholkar Murder Case Timeline: नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा 10 वर्षांनंतर लागणार निकाल? आतापर्यंत काय घडामोडी घडल्या?

केजरीवालांनी दाखल केली याचिका

दिल्लीच्या अबकारी कर घोटाळा प्रकरणी केजरीवाल गेल्या दीड महिन्यापासून तुरुंगात आहेत. ईडीनं केलेली अटक ही बेकायदा असल्याचा दावा केजरीवाल यांनी याचिकेतून केला असून त्यासाठी आपल्याला अंतरिम जामीन मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com