Randeep Surjewala : खासदार सुरजेवाला यांना निवडणूक आयोगाची नोटीस

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भाजप नेत्या हेमामालिनी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
Randeep Surjewala
Randeep Surjewalasakal

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भाजप नेत्या हेमामालिनी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी आयोगाने गुरुवारी (ता. ११) सायंकाळी पाच पर्यंतची मुदत दिली आहे.

या प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करणारे पत्र निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्षांना पाठविले आहे. काँग्रेस नेत्यांनी महिलांचा आदर करावा यासाठी त्यांना समज द्यावी असे या पत्रात म्हटले आहे. तसेच शुक्रवारपर्यंत याबाबत आयोगाला माहिती देण्याची सूचनाही आयोगाने या पत्रात केली आहे.

Randeep Surjewala
Loksabha Election 2024 : माझ्या मुलाचा पराभव व्हावा ,अँटनी ; काँग्रस पक्ष हाच धर्म असल्याचे प्रतिपादन करत भूमिका केली स्पष्ट

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यात सुरजेवाला हे भाजप नेत्या आणि मथुरा लोकसभा मतदार संघातील उमेदवार हेमामालिनी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करत असल्याचे दिसत होते.

या घटनाक्रमानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी रणदीप सुरजेवाला यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर, यावरून वाद वाढल्यानंतर सुरजेवाला यांनी सारवासारव करताना भाजपच्या आयटी सेलवर हल्ला चढवला होता.

‘‘विकृत स्वरुपातील माहिती प्रसारित करून खोट्या गोष्टी पसरविणे ही भाजपच्या आयटीसेलची सवय आहे’’ अशी टीका सुरजेवाला यांनी केली. तसेच मी हेमामालिनी यांचा आदर करतो, त्यांचा विवाह धर्मेंद्र यांच्याशी झाला असल्याने त्या आमच्या स्नुषा आहेत असेही सुरजेवाला यांनी म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com