कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

शक्तिशाली व सामर्थ्यवान भारतासाठी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे.
Guardian Minister Hasan Mushrif
Guardian Minister Hasan Mushrifesakal
Summary

'पंतप्रधान मोदी यांनी संविधान वाचविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसकडूनच संविधान मोडण्याचा व संविधानाचा अवमान झाला आहे.'

मुरगूड : ‘मुरगूड हे माझे जन्मगाव आहे. या परिसराचा भाऊ आणि मुलगा म्हणून साथ द्या आणि प्रचंड मताधिक्याने विजयी करा’, असे आवाहन महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी केले. या परिसराने दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांना हयातभर तळहातावरील फोडाप्रमाणे जीवापाड जपल्याची कृतज्ञता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुरगूडच्या ऐतिहासिक हुतात्मा तुकाराम भारमल चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शामराव घाटगे होते. प्रा. मंडलिक म्हणाले, ‘दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. देशाला स्थिर शासन दिले. आपल्याला देशाबरोबरच आपला जिल्हा बलशाली करायचा आहे. त्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा व विचाराचा वारसा घेऊन या निवडणुकीत उतरलोय. भूमिपुत्राला विजयी करण्यासाठी आपण या सभेद्वारे निर्धार करा.’

Guardian Minister Hasan Mushrif
Sangli Lok Sabha : 'चंद्रहार पाटलांना विजयी केले, तर विश्‍वजित कदमांना वाघ ही पदवी देऊ'; संजय राऊतांची मोठी घोषणा

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, ‘शक्तिशाली व सामर्थ्यवान भारतासाठी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी महायुतीच्या पाठीशी ठाम राहा. कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक वळणावरची आहेच, त्याशिवाय ही निवडणूक कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे. तालुक्याच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची व आत्मसन्मानाची निवडणूक आहे. त्याचे साक्षीदार व्हा.’

समरजितसिंह घाटगे म्हणाले,‘पंतप्रधान मोदी यांनी संविधान वाचविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसकडूनच संविधान मोडण्याचा व संविधानाचा अवमान झाला आहे. देशाचे नागरिकत्व डावलणाऱ्या व महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करण्याची ही वेळ आहे.’ ‘जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे आहेत, तोपर्यंत संविधानाला धक्का लागणार नाही. भावनिक करून मते मागणाऱ्यांना बळी पडू नका’, असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

Guardian Minister Hasan Mushrif
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : नारायण राणे हा कोकणचा स्वाभिमान आहे; असं का म्हणाले मंत्री केसरकर?

यावेळी अभिनेते गोविंदा यांनी हिंदी व मराठीत भाषण करीत उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना साथ देण्याचे जनतेला आवाहन केले. ‘प्रा. मंडलिक यांच्या विजयी मिरवणुकीत नाचू आणि गाणेही म्हणू’, असे ते म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक शिवसेना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांनी केले. यावेळी प्रवीणसिंह पाटील, आमदार तानाजीराव मुटकुळे, रणजितसिंह पाटील, कॉ. अशोक चौगले, ॲड. राणाप्रताप सासने, बबन बाबर, संकेत भोसले, भगवान पाटील यांची भाषणे झाली. सभेला शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, ॲड. वीरेंद्र मंडलिक, ‘बिद्री’चे संचालक सुनील सूर्यवंशी, दिग्विजय पाटील, आर. डी. पाटील, रावसाहेब खिलारे आदी उपस्थित होते. संतोष वंडकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com