Deepak Kesarkar Narayan Rane
Deepak Kesarkar Narayan Raneesakal

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : नारायण राणे हा कोकणचा स्वाभिमान आहे; असं का म्हणाले मंत्री केसरकर?

आज सावंतवाडीकर नागरिक राणे यांच्या प्रेमापोटी उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरला आहे.
Summary

लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे (Mayuti) उमेदवार केंद्रीय मंत्री राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात फेरी काढण्यात आली.

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) हा कोकणचा स्वाभिमान आहे. केंद्रातील मंत्रिपदाच्या माध्यमातून ते कोकणचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कोकणच्या विकासासाठी त्यांचे हे मंत्रीपद कायम राहणे आवश्यक असून या निवडणुकीत कोकणची जनता त्यांना निश्चित विजयी करेल. आज सावंतवाडीकर नागरिक राणे यांच्या प्रेमापोटी उस्फूर्तपणे रस्त्यावर उतरला आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले.

लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे (Mayuti) उमेदवार केंद्रीय मंत्री राणे यांच्या प्रचारार्थ शहरात आज सायंकाळी फेरी काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. नीलम राणे यांच्या हस्ते तर भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या फेरीचा श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. महायुतीच्या प्रचार कार्यालयापासून सुरू केलेली ही फेरी संपूर्ण शहरात काढण्यात आली. यात शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Deepak Kesarkar Narayan Rane
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : हॅट्ट्रिक तर होणार; पण पराभवाची की विजयाची? विनायक राऊत विरुद्ध नारायण राणेंमध्ये सामना

यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, मनोज नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सुरेश गवस, गुणाजी गावडे, तालुकाध्यक्ष उदय भोसले, संध्या तेरसे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, शिवसेनेच्या उपसंघटक अर्चना पांगम, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे.

Deepak Kesarkar Narayan Rane
Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

तसेच मोहिनी मडगावकर, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, आनंद नेवगी, नासीर शेख, सुरेंद्र बांदेकर, गुरुदास मठकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दीपाली भालेकर, मंदार नार्वेकर, संतोष गांवस, केतन आजगावकर, राघू चितारी, अशोक पवार, निशिकांत तोरस्कर, बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर, परिक्षीत मांजरेकर, तेजस माने, सुमित वाडकर, हेमंत बांदेकर, देव्या सुर्याजी, अर्चित पोकळे, प्रतीक बांदेकर, नंदू शिरोडकर, परीक्षित मांजरेकर, ॲड. राजू कासकर, श्रीपाद सावंत, बंडया केरकर, रवी नाईक, विनोद सावंत

उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com