Hatkanangale Lok Sabha : ..अन् धैर्यशील मानेंनी शेट्टींचा पराभव करून आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेतला!

हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व सलग दोनवेळा निवेदिता माने करत होत्या.
Hatkanangale Lok Sabha
Hatkanangale Lok Sabha esakal
Summary

पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरलेले शेट्टी तब्बल ९५ हजार ६० मताधिक्यांनी विजयी झाले. २०१४ मध्ये पुन्हा त्यांनीच या मतदार संघात भाजपच्या साथीने विजय मिळवला.

Hatkanangale Lok Sabha : लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) व निवेदिता माने (Nivedita Mane) यांच्यात लढत झाली. या लढतीत ‘स्वाभिमानी’च्या सभांमधून दिली जाणारी ‘वहिनींना सुट्टी, राजू शेट्टी’ ही घोषणा चांगलीच गाजली. किंबहुना माने यांच्या या निवडणुकीतील पराभवाला जेवढी कारणे होती, त्यापैकी ही एक घोषणाही कारण ठरली. ही घोषणाच या निवडणुकीची ‘टर्निंग पॉईंट’ ठरली, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.

Hatkanangale Lok Sabha
Satara Lok Sabha : कऱ्हाडच्या दोन्ही आमदारांची दिलजमाई; मतभेद विसरून पृथ्वीराज चव्हाण-बाळासाहेब पाटील आले एकत्र

ऊसदराच्या प्रश्‍नावरून वीस वर्षांपूर्वी शेट्टी यांनी केवळ जिल्ह्याचेच नव्हे, तर महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. आक्रमक भाषणे, तेवढीच आक्रमक आंदोलने आणि आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा त्यांचा निर्धार, यामुळे ते लोकांतही चांगलेच प्रसिध्द झाले होते. त्यांनी पहिल्यांदा २००२ ची जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि त्यात ते मोठ्या मतांनी विजयी झाले.

पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश आल्यानंतर शेट्टी यांचा आत्मविश्‍वास वाढला. या जोरावर त्यांनी जिल्हा परिषदेनंतर अडीच वर्षांनी म्हणजे २००४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उडी मारली. या निवडणुकीत त्यांचा सामना काँग्रेसच्या (Congress) रजनी मगदूम यांच्याशी झाला. आता आपण दिल्लीच्या संसदेत जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवला पाहिजे, या महत्त्वाकांक्षेतून त्यांनी २००९ च्या लोकसभेच्या मैदानात उडी घेतली. त्यावेळी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व सलग दोनवेळा निवेदिता माने करत होत्या.

Hatkanangale Lok Sabha
Sangli Lok Sabha : 'सांगली' लढण्यावर काँग्रेस ठाम; शरद पवारांच्या मध्यस्थीकडं लक्ष, वादग्रस्त जागांवर अंतिम तोडगा निघणार?

त्यांच्याविषयी मतदार संघात असलेली नाराजी आणि शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शेट्टी यांची असलेली हवा या जोरावर ते या निवडणुकीत उतरले. ‘एक वोट, एक नोट’चा नारा देत त्यांनी रणशिंग फुंकले. त्यांच्या या आवाहनालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला. १४ एप्रिल २००९ मध्ये माने यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची मलकापुरात सभा होती. सभेची वेळ दुपारी बाराची, पण दोन वाजले तरी सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी सभा आटोपती घेत पवार हे त्याचदिवशी महाराणा प्रताप चौकात आयोजित संभाजीराजे छत्रपती यांच्या सभेसाठी आले. त्याच रात्री शेट्टी यांच्या प्रचारार्थ कोडोलीत भव्य शेतकरी सभा झाली. या सभेतील एका चिमुकलीचे भाषण आणि तिने दिलेली ‘वहिनींना सुट्टी, राजू शेट्टी’ ही घोषणा लोकप्रिय ठरली.

Hatkanangale Lok Sabha
Sangli Lok Sabha : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांच्या उमेदवारीनंतर नवा ट्विस्‍ट; बाबर-पाटील गटाच्या भूमिकांकडं लक्ष

याच घोषणेची नंतर टॅगलाईन झाली आणि अख्ख्या मतदार संघात या घोषणेचाच बोलबोला सुरू झाला. त्यावेळी शेट्टी यांच्या मतदार संघात होणाऱ्या सर्वच सभा गाजत होत्या, पण त्यात कोडोलीची ही सभा आणि त्यातली ही घोषणा गाजली. त्यावेळी ही निवडणूक शेट्टी विरुध्द माने अशीच झाली आणि पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरलेले शेट्टी तब्बल ९५ हजार ६० मताधिक्यांनी विजयी झाले. २०१४ मध्ये पुन्हा त्यांनीच या मतदार संघात भाजपच्या साथीने विजय मिळवला. काळाच्या ओघात माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतली, तर २०१९ मध्ये त्यांचे पुत्र खासदार धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरून शेट्टी यांचाच पराभव करून २००९ च्या निवडणुकीतील आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com