Kolhapur Lok Sabha CM Eknath Shinde
Kolhapur Lok Sabha CM Eknath Shindeesakal

'मोदी गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचा काटा किर्रर्र झाल्याशिवाय राहणार नाही'; मुख्यमंत्री शिंदेंचा काँग्रेसवर घणाघात

'देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी फक्त नरेंद्र मोदींकडे आहे.'
Summary

'गेल्या ४०-५० वर्षांत जे कॉंग्रेसला जमले नाही ते सर्व घटकांना न्याय देण्याचे, देशाला बलशाली बनविण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.'

कोल्हापूर : ‘देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी फक्त नरेंद्र मोदींकडे आहे. बहुजनांच्या विकासाची, महिला सक्षमीकरणाची, तरुणांच्या स्वप्नांच्या पूर्तीची ही गॅरंटी आहे. या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांचा काटा किर्रर्र झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचे (Congress) काय चालले आहे, ‘येड्याची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस’ आहे. मोदींकडे केवळ पेढे नाहीत. त्यांच्याकडे विकासाची गॅरेंटी आहे, म्हणून महायुतीला मत द्या’, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे केले.

याचवेळी, ‘ही लढाई स्थानिक उमेदवारांची नाही. ही लढाई नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरुद्ध राहुल गांधींची आहे. म्हणून संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि धैर्यशील मानेंना मतदान करून कोल्हापूरचा हुंकार दिल्लीत पाठवा’, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. येथील तपोवन मैदानावर (Tapovan Maidan Kolhapur) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर संकल्प सभेत ते बोलत होते.

Kolhapur Lok Sabha CM Eknath Shinde
Kolhapur Lok Sabha : धर्माच्या नावाखाली ओबीसी, दलित आरक्षणाला धक्का लावयाचा काँग्रेसचा घाट; कोल्हापुरात मोदींचा घणाघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवाला जीव देणाऱ्या कोल्हापूरकरांना माझा रामराम करून भाषणाला सुरुवात केली. इथली जनता सात मे रोजी धनुष्यबाणासमोरील खटक्यावर बोट ठेवील आणि विरोधकांचा टांगा पलटी करेल. मोदी हे विश्‍वनेते आहेत. मोदींचा कोणी नाद करायचा नाही. उमेदवार धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत, संजय मंडलिकांना मत म्हणजे मोदींना मत आहे. मोदी है तो सब मुमकीन है. देशात फक्त एकच मोदी गॅरंटी चालते. बाकी सर्व गॅरंटी फेल गेली आहे. महापुरात कोल्हापूरकरांच्या माणुसकीचे दर्शन घडले.

दुसरीकडे बाळासाहेबांना ‘मातोश्री’वर ठेवून स्वतः ‘फाईव्हस्टार’मध्ये राहणारे कुठे आणि हे कोल्हापूरकर कोठे? शिवसेना कधी कॉंग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ येईल तेव्हा माझे हे दुकान बंद करीन,’ असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यांचा मुलगा, त्यांचा परिवार आता पंजाला मतदान करणार आहेत. हे या राज्याचे दुर्दैव आहे. आता ‘उबाठा’ची शंभर टक्के कॉंग्रेस झाली आहे. आजही आईच्या पदराला धरून राजकरण करणारा पंतप्रधान आपल्याला नको, परदेशात देशाची बदनामी करणारा नको. तर परदेशात देशाचा सन्मान वाढविणारा पंतप्रधान पाहिजे.’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लढाई संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नाही, ही लढाई धैर्यशील माने विरोधी महाविकास आघाडी अशी नाही. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचे सांगितले. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेने ठरविले आहे, ‘मान गादीला आणि मत मोदींना’ द्यायचे आहे. आपण प्रभु रामांना मानणारे आहोत. त्यांच्या हातात धनुष्यबाण आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातात धनुष्यबाण आहे. धैर्यशील मानेंच्या हातात धनुष्यबाण आहे. संजय मंडलिकांच्या हातात धनुष्यबाण आहे. म्हणून या धनुष्यबाणाला दिलेले मत विकसित भारताला दिलेले मत आहे. आम्ही कोल्हापूरला टोलमुक्त केले. ज्यांनी टोलमुक्त केले त्यांचा उमेदवार मंडलिक आहेत.’

Kolhapur Lok Sabha CM Eknath Shinde
शरद पवारांना मोठा धक्का! सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदेंसह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; अटक होण्याची शक्यता?

ते पुढे म्हणाले, ‘ देशात बॉम्‍बस्फोट व्‍हायचे त्यावेळी आमच्या देशातील पंतप्रधान अमेरिकेत जाऊन हात जोडून म्हणायचे त्या पाकिस्‍तानला समजावा. त्या पाकिस्‍तानने एक हल्ला केला तर त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला. त्यामुळे देशात घुसून बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली काय? आता देशाकडे कोणी वाकडी नजर करू शकत नाही. कोविडमध्ये सर्वजण चिंतेत होते. पण त्यावेळी भारतातील या वाघाने शास्त्रज्ञांना सांगून स्वदेशी लस तयार केली. यातून संपूर्ण जगाला भारत काय आहे हे दाखवून दिले.’

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘गेल्या ४०-५० वर्षांत जे कॉंग्रेसला जमले नाही ते सर्व घटकांना न्याय देण्याचे, देशाला बलशाली बनविण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी माने-मंडलिक यांना दोन ते तीन लाखांच्या मतांनी विजयी करावे.’ माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा. करवीरनिवासिनी श्री. अंबाबाई, जोतिबा, खिद्रापूरच्या विकास आराखड्याला गती द्यावी, या मागण्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे कराव्यात, असेही त्यांनी सुचविले. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘सातारा-कागल, संकेश्वर-बांदा, कोल्हापूर-रत्नागिरी, रेल्वे आणि विमानतळ, जलजीवन योजना, ई-बसेस, आदींसाठी कोल्हापूरला पंतप्रधान मोदींनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.’ सभेत आमदार प्रकाश आवाडे, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचीही मनोगते झाली.

Kolhapur Lok Sabha CM Eknath Shinde
Raigad Lok Sabha : कट्टर मुस्लीम शिवसैनिकांचं गाव! रायगडचं राजकारण 'या' गावातूनच चालतं...

लंगोट घालण्याऐवजी त्या नेत्याने पळ काढला

‘आमच्या कपाळाला माती लागली की, आम्ही कुस्ती चितपट केल्याशिवाय सोडत नाही असे एका विरोधी नेत्याने वक्तव्य केले आहे. मात्र, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक स्वतः मल्ल होते. त्यांचा मुलगा प्रा. मंडलिक स्वतः लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्या नेत्याने देखील स्वतः लंगोट घालून मैदानात उतरायला हवे होते. मात्र, त्यांनी पळ काढला, शेपूट घातली आहे, असा टोला आमदार राजेश पाटील यांनी लगावला.

माझ्याविरोधी उमेदवारांचे प्रवक्ते जास्त बोलतात, भ्रम निर्माण करतात. गरीब हटावची घोषणा देत वर्षानुवर्षे भ्रमात ठेवण्याची कॉंग्रेसची जुनी सवय असून तोच कित्ता ते गिरवितात. पण, कोणत्याही भूलथापांना बळ पडू नका. मतदारसंघात विविध विकासकामे केली आहेत. ग्रामीण भागात सुमारे ८०० कोटींची कामे सुरू आहेत. कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासह मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मला विजयी करा.

-खासदार प्रा. संजय मंडलिक

पाच वर्षांत कोणावरही टीका केली नाही. माझ्या मतदारसंघात ८ हजार २०० कोटींची कामे केली आहेत. कुणावर वाईट बोलून मत मिळविण्याची ही निवडणूक नसून ती तरुणाईचे भविष्य घडविणारी, पंतप्रधानांचे हात बळकट करणारी आहे. प्रभू रामचंद्रांच्या खांद्यावरील धनुष्यबाण घेऊन परत एकदा दिल्लीवारीला निघालो असून आपण सर्वांनी मतरुपी आशीर्वाद द्यावा.

-खासदार धैर्यशील माने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com