Nana Patole
Nana PatoleSakal

Lok Sabha Election 2024: काँग्रेसची कामगिरी चांगली, परंतू विधानसभेपर्यंत टिकणार का?

दलित आणि मुस्लिम मते टिकवून ठेवणे हे काँग्रेसपुढील आव्हान आहे.
Published on

-पांडुरंग म्हस्के

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश पाहता काँग्रेसने चांगली कामगिरी केली की लोकांनीच निवडणूक हातात घेतल्याने काँग्रेसला यश मिळाले हा प्रश्न आहे. मात्र काही असले, तरी या निवडणूक निकालाने संजीवनी मिळाली हे मात्र खरे. दलित आणि मुस्लिम मते टिकवून ठेवणे हे काँग्रेसपुढील आव्हान आहे. (Lok sabha Election 2024 Congress performance is good but will it last till assembly elections)

Nana Patole
Bajarang Sonawane: "जरांगे फॅक्टर इथं शंभर टक्के कामाला आला"; विजयाचा गुलाल उधळल्यानंतर बजरंग सोनावणेंनी व्यक्त केल्या भावना

काँग्रेसची मागील निवडणुकीतील कामगिरी पाहता पक्ष संपल्याच्या वल्गना सत्ताधारी पक्ष करू लागला होता. पक्षातून अशोक चव्हाण यांच्यासारखा नेता भाजपमध्ये गेल्यानंतरही पक्षाने दिलेली लढत ही वाखाणण्यासारखी आहे. या निवडणुकीत राज्यातील एकही प्रभावी नेता प्रचारासाठी नसताना काँग्रेसची कामगिरी नेत्रदीपक अशीच आहे. गेल्या वेळी केवळ एकच खासदार असलेल्या काँग्रेस पक्षाने यंदा चांगलीच मुसंडी मारत १३ जागांवर विजय मिळवला आहे.

Nana Patole
PM Modi : "सहा दशकांनंतर मतदारांनी इतिहास रचला"; विजयी भाषणानंतर PM मोदींनी मानले देशवासियांचा आभार

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून भाजपने सत्ता हस्तगत केली. काँग्रेसमध्ये त्यांना फूट पडणे शक्य झाले नाही तरी पक्षातील मोठे नेते त्यांनी बाहेर काढले. त्यामुळे राज्याच्या पातळीवर फारसे प्रभावी नेतृत्व पक्षात नव्हते. तरीही केवळ मतदारांच्या विश्वासावर काँग्रेस पुनरुज्जीवित झाला आहे.

पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काढलेली ‘भारत जोडो यात्रा’, त्यानंतरची न्याय यात्रा याचा सकारात्मक परिणाम देशात तर दिसलाच शिवाय राज्यातील ज्या भागातून या यात्रा गेल्या त्या ठिकाणी जनमत करण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी विदर्भात घेतलेल्या प्रचार सभा आणि प्रियांका गांधी यांच्या सभांचा काँग्रेसच्या उमेदवारांना चांगलाच फायदा झाला. या निवडणुकीत पक्षाचा चांगला जोर राहिला तो विदर्भात. विदर्भातील सहा जागांपैकी पाच जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसने राज्यभरात १७ जागा लढविल्या त्यापैकी १३ जागांवर विजय मिळविला.

Nana Patole
Beed: बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती; पोलीस महासंचालकांनी लक्ष ठेवण्याचा शरद पवारांचं आवाहन

यश टिकविणे महत्त्वाचे

यंदाचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजयाचे प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे ७६.४७ टक्के एवढा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हेच प्रमाण कायम राखणे काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक मुद्द्यावर लढविली जाणार असल्याने सध्या भाजप नको म्हणून काँग्रेसकडे वळलेली मुस्लिम आणि दलित मते टिकवून ठेवण्यात काँग्रेसला यश मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com