Loksabha Election 2024 : ''भाजप देशावर एक देश, एक भाषा लादत आहे'' राहुल गांधींची कन्नूरच्या सभेत टीका

व्यासपीठावर असलेले फूल हातात घेऊन लोकांना दाखवत राहुल गांधी म्हणाले, आपला देश या फुलासारखा आहे. प्रत्येक फुलाचा रंग वेगळा आहे. परंतु मी जर म्हटले, यात केवळ पांढरेच फूल हवे आहे आणि त्याला पाने अजिबात नको, असे म्हटले तर कसे वाटेल? भाजप आणि संघ परिवार देखील देशाला असेच घडवू इच्छित आहे. याचा अर्थ त्यांना देशच कळलेला नाही.
Rahul Gandhi
Rahul Gandhiesakal

कन्नूर : सत्तारुढ पक्ष देशांतील जनतेवर एक इतिहास, एक देश, एक भाषा लादू इच्छित आहे. पण भाजपचे मनुसबे कधीही यशस्वी होणार नाहीत. या स्थितीपासून देशातील जनतेला वाचविण्याचा कॉंग्रेसने निर्धार केला आहे, ’’ असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. केरळच्या कन्नूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

लोकसभा निवडणुकीवरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज कन्नूरच्या सभेत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, सत्तारूढ पक्ष देशावर एक देश, एक भाषा, एक इतिहास लादू इच्छित आहे. पण या गोष्टीपासून कॉंग्रेस पक्ष देशाला वाचवत आहे. केरळ आणि तमिळनाडूत येऊन यापुढे आता देशात एकच भाषा असेल असे कोणी बोलले तर चालेल का? भाजपने ईडी आणि सीबीआयला विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध शस्त्र म्हणून वापरले असून त्या आधारावर देशाचे वातावरण बदलण्याचा घाट घातला जात आहे.

Rahul Gandhi
Sandeep Reddy Vanga : “सिनेमातील तुमचा चेहराच बदलतो”; 'अ‍ॅनिमल'च्या डायरेक्टरची आदिल हुसैन यांना धमकी

यावेळी व्यासपीठावर असलेले फूल हातात घेऊन लोकांना दाखवत राहुल गांधी म्हणाले, आपला देश या फुलासारखा आहे. प्रत्येक फुलाचा रंग वेगळा आहे. परंतु मी जर म्हटले, यात केवळ पांढरेच फूल हवे आहे आणि त्याला पाने अजिबात नको, असे म्हटले तर कसे वाटेल? भाजप आणि संघ परिवार देखील देशाला असेच घडवू इच्छित आहे. याचा अर्थ त्यांना देशच कळलेला नाही.

पंतप्रधानांनी अलीकडेच तमिळनाडूत येऊन डोसा आवडत असल्याचे म्हटले. मलाही डोसा आवडतो. परंतु राज्याचा विचार करणे गरजेचे आहे. भारत कधीही बदलू शकत नाही आणि यात पंतप्रधान वेळ वाया घालवत आहेत. मोदी हे देशांत अशांतता निर्माण करू इच्छित आहेत.लोकांचे मन दुखवायचे आहे.’’ असा आरोप राहुल गांधींनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com