Prakash Ambedkar : 'वंचित'च्या 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; माढ्यातून बारसकर तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंविरोधात ‘वंचित’चे गायकवाड

Prakash Ambedkar
Prakash Ambedkaresakal

Vanchit Second List : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होत नसतानाच वंचित बहुजन आघाडीने रविवारी आपल्या उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली. अकरा जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

या यादीनुसार, हिंगोलीतून डॉ. बी. डी. चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे, तर लातूरमधून नरसिंहराव उदगीरकर यांना संधी देण्यात आली आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात ‘वंचित’ने राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरविले आहे. याशिवाय, रमेश बारसकर (माढा), मारूती जानकर (सातारा), अब्दुल रेहमान (धुळे), दादागौडा पाटील (हातकणंगले), संजय ब्राह्मणे (रावेर), प्रभाकर बकले (जालना), अबुल हसन खान (मुंबई उत्तर मध्य), काका जोशी (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) यांची नावे यादीत आहेत.

या उमेदवारांमध्ये धनगर, मुस्लीम आणि बौद्ध समाजाचे प्रत्येकी दोन जण, तर बंजारा, मातंग, माळी (लिंगायत), जैन आणि कुणबी समाजाच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

वंचित आघाडीची दुसरी यादी

  1. हिंगोली- डॉ. बी. डी. चव्हाण

  2. लातूर- नरसिंहराव उदगिरकर

  3. सोलापूर- राहुल काशिनाथ गायकवाड

  4. माढा- रमेश नागनाथ बारसकर

  5. सातारा- मारुती धोंडिराम जानकर

  6. धुळे- अब्दुल रहमान

  7. हातगणंगले- दादागौडा पाटील

  8. रावेर- संजय ब्राह्मणे

  9. जालना- प्रभाकर बकळे

  10. उत्तर मध्य मुंबई- अबुल हसन खान

  11. रत्नागिरी-सिंधुदुर्ग- काका जोशी

वंचितचे पहिल्या यादीतील उमेदवार

अकोला- ॲड. प्रकाश आंबेडकर, भंडारा-गोंदिया संजय गजानद केवट,

गडचिरोली-चिमूर हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूर राजेश वारलूजी बेले,

बुलडाणा - वसंत राजाराम मगर, अमरावती- प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान,

वर्धा- प्रा. राजेंद्र साळुंके, यवतमाळ-वाशिमसाठी सुभाष खेमसिंग पवार

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत यात चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर, नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. बुलढाण्यातून वसंत मगर, सांगलीतून प्रकाश शेंडगे, भंडाऱ्यातून संजय केवटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

Prakash Ambedkar
Supriya Sule : शरद पवारांना संपविण्याचे भाजपाचे षडयंत्र? सुप्रिया सुळे यांचा आरोप

दुसऱ्या यादीमध्ये चर्चेतील मतदारसंघामध्ये उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये माढ्यातून रमेश बारसकर, सोलापूरमधून राहुल गायकवाड, लातूरमधून नरसिंहराव उदगिरकर यांच्या नावांचा समावेश आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने नागपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार आहे. दुसरीकडे कोल्हापूरमध्येही वंचितने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com