Supriya Sule : शरद पवारांना संपविण्याचे भाजपाचे षडयंत्र? सुप्रिया सुळे यांचा आरोप

भाजपाला विकासाचे किंवा जनतेच्या हिताचं काही देण घेणं नाही. भाजपाचे नेते गेल्या काही वर्षांपासून बारामतीत बैठका घेत आहेत. त्यांना केवळ शरद पवार यांना संपवायचे आहे.
Supriya Sule
Supriya SuleSakal

- बेलाजी पात्रे

वाकड/हिंजवडी : भाजपाला विकासाचे किंवा जनतेच्या हिताचं काही देण घेणं नाही. भाजपाचे नेते गेल्या काही वर्षांपासून बारामतीत बैठका घेत आहेत. त्यांना केवळ शरद पवार यांना संपवायचे आहे. याबाबत त्यांचे नेते बारामतीत पत्रकार परिषदेत चॅनलला मुलाखत देताना बोलले आहेत. असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी ताथवडेत केला.

सुळे यांनी रविवारी (ता. ३१) आयटी नगरी माण येथील मेगा पोलीस व ताथवडेतील पॅलेडिओ सोसायटीला भेट देऊन रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, गंगाराम मातेरे, शिवाजी बुचडे,

दीपाली कोकरे, शिवाजी जांभुळकर, सविता गवारे, निकिता रानवडे, स्वाती ढमाले, दगडू करंजावने, संदीप साठे, सुप्रिया पवार, विजय पवार, रुपाली ढोकळे, चेअरमन चेतन पगारे, गुंजन शहा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुळे पुढे म्हणाल्या, शरद पवारांच्या रूपाने दिल्लीत असलेला महाराष्ट्राचा बुलंद आवाज संपविण्याची भाषा भाजप करत आहे. उमेदवारी देखील माझ्या मोठ्या वहिनीला दिली. मी ज्या संस्कृतीत वाढले त्या संस्कृतीत मोठ्या भावाची बायको आईच्या जागी आहे. त्यामुळे आईच्या जागेवर मला वहिनी आहेत माझ्या मोठ्या भावाच्या पत्नी आहेत. त्यातच भाजपकडे कुठलाही उमेदवार नाही तो पण कशासाठी तर पवार साहेबांना संपवण्यासाठी. हेच गलिच्छ राजकारण भाजप करतय आहे.

जशी मी पवारांची लेक ताशा सुनेत्रा वहिनीही

अतिशय सुसंस्कृत अशा आमच्या सुनेत्रा वहिनी आहेत. त्या गेल्या अनेक वर्षे आमच्या घरात नांदल्या आहेत जशी मी पवाराची लेक ताशा त्याही पावरांची लेक आहेत त्यामुळे अर्थातच त्यांचा मान सन्मान मी करते. मी इंडिया आघाडीचे आभार मानते की, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मतदारांच्या आशिर्वादाने मी या देशाची निष्ठेने सेवा करेन. ही कौटुंबिक लढाई नसून माझ्यासाठी वैचारिक लढाई आहे.तर माण मध्ये त्या म्हणाल्या, अदृश्य शक्ती कशाप्रकारे त्रास देत आहे ते सर्वांना माहितच आहे. याचे योग्य उत्तरही जनता येत्या निवडणूकीत देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com