'महायुतीचे उमेदवार नारायण राणे तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील'; नीतेश राणेंना विश्वास

मागील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हवे होते म्हणून विनायक राऊत यांना तुम्ही मतदान केले.
Mahayuti candidate Narayan Rane
Mahayuti candidate Narayan Raneesakal
Summary

''आताची ठाकरे शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना नाही. त्यामुळे १९९० पासून राणेंच्या माध्यमातून काम करणारे कडवट शिवसैनिक हे राणे यांनाच मतदान करणार आहेत.''

कणकवली : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वत्र मतदारांचा अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. आमचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) तीन ते साडेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील. विरोधकांचा पराभव झालाच आहे. त्यांनी तो मान्य केला आहे. मैदानात हरवू शकत नसल्याने ते आता वाटेल ते आरोप करत असल्याचे प्रतिप्रादन आज आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

वरवडे फणसनगर येथील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर श्री. राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मतदारांना अशी संधी पुन्हा पाच वर्षे मिळणार नाही. कोकणात जर आपल्याला परिवर्तन घडवायचे असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून विकास घडवायचा असेल तसेच ज्यांनी ३५ वर्षे नि:स्वार्थीपणे या मतदारसंघात सेवा केली त्यांना अजून पुढची पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्या. परिवर्तन घडविण्यासाठी उमेदवार राणे यांना विजयी करणे आवश्यक आहे.

Mahayuti candidate Narayan Rane
रत्नागिरी-सिंधुदुर्गात 64 टक्के मतदान; 'या' 9 उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद, कोण मारणार बाजी?

गेली दहा वर्षे येथील विकास थांबला होता. येथील खासदार कुठे होते? मागील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हवे होते म्हणून विनायक राऊत यांना तुम्ही मतदान केले. मात्र, आता केंद्रीय मंत्री राणे यांना मतदान करून मोदींचे हात बळकट करण्याची आवश्यकता आहे.’’

Mahayuti candidate Narayan Rane
Kiran Samant : मतदानादिवशीच मंत्री उदय सामंतांचे भाऊ किरण सामंत 'नॉट रिचेबल'; राजकीय चर्चांना उधाण

ते पुढे म्हणाले, ‘‘मी आज उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे यांच्या संपर्कात होतो. सर्वत्र अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागातही उत्स्फूर्तपणे मतदान झाले. १९९० पासूनचे जुने शिवसैनिक जे नारायण राणेंशी जोडले गेले होते, तेही मतदानासाठी बाहेर पडलेले दिसले. आताची ठाकरे शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना नाही. त्यामुळे १९९० पासून राणेंच्या माध्यमातून काम करणारे कडवट शिवसैनिक हे राणे यांनाच मतदान करणार आहेत.

या मतदारसंघातील मतदानाचा फायदा निश्चितपणे महायुतीला होईल.’’ ते म्हणाले, ‘‘येथील खासदार गेली दहा वर्षे काही करू शकलेले नाहीत. निवडणुकीच्या मैदानात प्रचार करताना आमच्यावर टीका केली. पण, त्यांनी काय केले? कोणता रोजगार दिला, हे सांगू शकत नाहीत. ते आम्हाला मैदानात हरवू शकत नाहीत. त्यामुळे असे आरोप करून ते पराभव मान्य करत आहेत. त्यामुळे राणे यांचाच विजय होईल.’

Mahayuti candidate Narayan Rane
18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

...म्हणून सामंत ‘नॉट रिचेबल’

‘किरण सामंत नॉट रिचेबल’च्या या विषयावर त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘सामंत हे ज्या मतदारसंघात होते त्या ठिकाणी नेटवर्क नसल्याने त्यांचा फोन नॉट रिचेबल येत होता. मी पण आज दुपारी देवगड तालुक्यात होतो. तेथेही काही भागात नेटवर्क नव्हते. मग मीही नॉट रिचेबल म्हणायचे का? अनेक ठिकाणी बीएसएनएल तसेच खासगी कंपनीचे नेटवर्क नाही. हे नेटवर्क आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे आणि हे काम राणे यांच्या माध्यमातून करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे सरकार आपल्याला हवे आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com