Satara Lok Sabha : 'मोदींच्या रेकॉर्ड ब्रेक सभेत उदयनराजेंच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार'; मंत्री देसाईंना विश्वास

महायुतीचे चारही आमदारांनी खासदार उदयनराजेंचा प्रचार जोमाने सुरू केला आहे.
Mahayuti Candidate Udayanraje Bhosale Satara Lok Sabha
Mahayuti Candidate Udayanraje Bhosale Satara Lok Sabhaesakal
Summary

'मविआने घोटाळे करणारे भ्रष्टाचारी, माथाडी, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहार करणारा उमेदवार उभा केला आहे.'

सातारा : सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीचे चारही आमदारांनी खासदार उदयनराजेंचा प्रचार जोमाने सुरू केला आहे. त्यातून सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या रेकॉर्ड ब्रेक सभेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेही (Ramdas Athawale) येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Mahayuti Candidate Udayanraje Bhosale Satara Lok Sabha
'28 वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करतोय, आम्हाला तिकीट देऊ नका; पण..'; काय म्हणाले बंडखोर उमेदवार खाडे?

या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale), महेश शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे नेते पुरुषोत्तम जाधव, अमित कदम, माजी आमदार कांताताई नलावडे, मनोजदादा घोरपडे, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक चित्रलेखा माने-कदम, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे आदी उपस्‍थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, ‘‘खासदार उदयनराजे यांच्या प्रचारार्थ ‘मी स्वतः माझ्या मतदारसंघात ११ जाहीर सभा घेणार आहे. पाटणमध्‍ये बंधू रविराज आणि मुलगा यशराज यांचे गावोगावी काम सुरू आहे. पाटण व कऱ्हाडच्या दोन्‍ही मतदारसंघांत उदयनराजेंना मताधिक्य मिळेल. आमदार मकरंद पाटील हे पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले आहेत. त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघात उदयनराजेंचे काम करत आहेत. माजी आमदार मदन भोसले यांनीही काम सुरू केले आहे. त्‍यामुळे आम्‍हाला वाई येथे मताधिक्य मिळणार आहे.’’

Mahayuti Candidate Udayanraje Bhosale Satara Lok Sabha
हमीदवाडा कारखाना कर्नाटकातील बड्या नेत्याला विकला? मुश्रीफ म्हणाले, राजकारणासाठी किती बदनामी..

उदयनराजे म्हणाले, ‘‘विरोधकांना जिल्ह्यामध्ये चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व उमेदवार मिळू नये हे दुर्दैव आहे. घोटाळे करणारे भ्रष्टाचारी, माथाडी, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहार करणारा उमेदवार उभा केला आहे. लोकशाहीच्या न्यायालयात त्यांना नक्कीच शिक्षा होईल.’’ आमदार महेश शिंदे यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत उठवलेला आवाज योग्यच असल्याचे नमूद करत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सहा आमदार पाहायला मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Mahayuti Candidate Udayanraje Bhosale Satara Lok Sabha
National Anthem : 'या' मराठी खासदारामुळेच संसदेत राष्ट्रगीत गायला झाली सुरुवात..

वाईतून मताधिक्य देणार : पाटील

सुरुवातीला पंचवीस वर्षांपासून अस्तित्वात असणाऱ्या घड्याळ चिन्हाला उमेदवारी मिळावी, असा आमचा आग्रह होता. विचार होता. मात्र, कालांतराने वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यावर खासदार उदयनराजे भोसले यांचे नेतृत्व मान्य करण्याचे ठरले. आमच्यात कोणतीच नाराजी नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे वाईकरांनी ठरवले. आम्ही त्यांना मताधिक्य देणार आहे, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला.

पवारांनी यशवंत विचार संपवला : उदयनराजे

गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. मात्र, त्यांनी तयार केलेली घटनाच सध्याच्या संचालकांनी बदलली. राज्याचा मुख्यमंत्री रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असल्यास विकास झाला असता; परंतु त्यांनी घटना स्वतःच बदलली आणि स्वतःलाच तहहयात अध्यक्ष करून घेतले. त्यातून लोककल्याण, गोरगरिबांसाठी काम करणे हा यशवंत विचार त्यांनी संपवून टाकल्याचा टोला उदयनराजेंनी ज्येष्ठ नेत शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.

Mahayuti Candidate Udayanraje Bhosale Satara Lok Sabha
Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीचा निकाल सांगा आणि 21 लाख रुपये जिंका; 'अंनिस'चे ज्योतिषाचार्यांना आव्हान

मी बोलण्यावर ठाम : महेश शिंदे

आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार यांनी यशवंत विचार सांगू नयेत, याचा पुनर्उच्चार केला. मी माझ्या विचारांवर ठाम आहे, कारण यशवंतराव चव्हाण यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व आणि विरोधकांनी दिलेला उमेदवारांचे कर्तृत्व हे पूर्णपणे भिन्न आहे. अशा घोटाळेबाजांना यशवंतराव चव्हाण साहेबांनी कधीच उभे केले नसते. त्यामुळे शरद पवार यांनी यशवंत विचारांची महती सांगू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com