Manoj Jarange: विधानसभेला सर्व 288 जागांवर उमेदवार देणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

येत्या सहा महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal

जालना : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा माहौल आहे. या निवडणुकीवर राज्यात जरांगेंच्या मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसेल का? याची चर्चा सुरु आहे. यानंतर चार महिन्यांनी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकीवर मात्र मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव असेल असं सुतोवाच स्वतः मनोज जरांगे यांनी केलं आहे.

कारण विधानसभेला आम्ही सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत, अशी मोठी घोषणाच मनोज जरांगे यांनी केली आहे. शहागड इथं मतदान केल्यानतंर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. (Manoj Jarange announced candidates for all 288 assembly seats in Maharashtra)

Manoj Jarange Patil
Lok Sabha Election 2024: देशभरात दुसऱ्या टप्प्यात 64.70 टक्के मतदान! महाराष्ट्रात 53.71 टक्के

मनोज जरांगे यांची प्रकृती सध्या ठीक नाही. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण उपचार सुरु असतानाही त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथून परभणी लोकसभा मतदारसंघातील शहागड इथल्या गोरी गांधारी मतदान केंद्रावर मतदानासाठी नेण्यात आलं. मतदान केल्यानंतर इथं त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. (Marathi Tajya Batmya)

Manoj Jarange Patil
Nanded Lok Sabha: मतदान करायला आला अन् ईव्हीएमवर घातले कुऱ्हाडीचे घाव! नांदेडमधील धक्कादायक घटना

यावेळी जरांगे म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिलेले नाहीत. पण आम्ही आता विधानसभेच्या तयारी लागलो आहोत. विधानसभेला सर्व २८८ जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. यावेळी त्यांनी लोकसभेला आपला कोणालाही पाठिंबा नाही, पण कोणाला मतदान करायचं हे मराठ्यांना बरोबर माहिती आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil
Video: दिल्ली पोलिसांनी धरला स्पायडरमॅन! स्टंट करणाऱ्या जोडीला कसं पकडलं जाळ्यात जाणून घ्या

आंबेडकर, छत्रपतींच्या गादीचा मान राखा

आंबेडकर आणि छत्रपतींच्या गादीचा मान राखला गेला पाहिजे असंही यावेळी जरांगे यांनी म्हटलं. दरम्यान, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. तर राजर्षी शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com