Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रिंगणात मराठा उमेदवार? जरांगे पाटील लवकरच भूमिका करणार जाहीर

अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे राज्यातील समाजबांधवांची शनिवारी (ता. ३०) बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी समाजातर्फे उमेदवार देणे, आंदोलनाची पुढील दिशा ठरवणे आदी विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal

वडीगोद्री (जि. जालना) : अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे राज्यातील समाजबांधवांची शनिवारी (ता. ३०) बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी समाजातर्फे उमेदवार देणे, आंदोलनाची पुढील दिशा ठरवणे आदी विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली.

Loksabha Election 2024
Nashik Loksabha Constituency : खासदार हेमंत गोडसे ‘वर्षा’वर तळ ठोकून

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारसंघनिहाय प्रत्येकी एक उमेदवार द्यावा, त्यासाठी जिल्हानिहाय समाजबांधवांनी चर्चा करून नावे ठरवावीत, नावांची यादी करावी, त्यानंतर पुढील निर्णय होईल, असे जरांगे यांनी यापूर्वीच्या बैठकीत स्पष्ट केले होते. त्यानुसार ही बैठक होत आहे.

जरांगे म्हणाले, ‘‘उमेदवारांबाबत आपापल्या गावांत झालेल्या चर्चेचा अहवाल समाजबांधव या बैठकीसाठी घेऊन येतील. अहवालांवर बैठकीत चर्चा होईल. सर्वांचे मते अजमावून कोणाकोणाला निवडणूक रिंगणात उभे करायचे याचा निर्णय घेतला जाईल. दिवसभर चर्चा केल्यानंतर सांयकाळी योग्य ती भूमिका जाहीर केली जाईल’’.

बैठकीत तरुणाला मारहाण

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवारी मराठा समाजातील काही व्यक्तींनी येथील मराठा मंदिर सभागृहात बैठक आयोजित केली होती. यात आरोप-प्रत्यारोपातून एकातरुणाला मारहाण झाली. त्यामुळे एकच गोंधळ झाला.

छत्रपती संभाजीनगरमधील घटना आपसात असलेल्या वादाची आहे. अनेक वर्षांनंतर मराठा समाज एकत्र आला. आपल्यात फूट पडू देऊ नका. एकादिलाने काम करा, आपसातील वाद मिटवा.

- मनोज जरांगे पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com